धक्कादायक :दापोडीत १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा गळा दाबून खून
पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी-चिंचवडमधील दापोडी येथे एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा गळा दाबून खून करण्यात आल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे . ही धक्कादायक घटना गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास उघडकीस आली. खून झालेल्या अल्पवयीन मुलीसोबत काही अघटित घडलं असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. शवविच्छेदन अहवालात ते स्पष्ट होणार आहे. या प्रकरणी संशयित सावत्र बाप (वडील) फरार आहे. त्याचा शोध भोसरी पोलिस घेत आहेत.
तर हा खून सावत्र वडिलाने केल्याचा संशय भोसरी पोलिसांना व्यक्त केला आहे. त्यामुळे पोलिसांनी फरार वडिलांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह राहत्या घरात आढळून आला. मृत मुलीची बहीण शाळेतून घरी आली. तेव्हा, घराला बाहेरून कुलूप होते. त्यामुळे बराच वेळ तिने वाट पाहिली. त्यानंतर कंटाळून अखेर कुलूप तोडले आणि गंभीर घटना समोर आली. या अल्पवयीन मुलीचा गळा आवळून खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे दोपोडीत आई, बहीण आणि सावत्र वडील अस तीचे कुटुंब रहात होतं