‘ओ शेठ तुम्ही तर बांधले नरेंद्र मोदींचेच मंदिर थेट…
पुणे (वास्तव संघर्ष) : संपुर्ण महाराष्ट्रात’ ओ शेठ तुम्ही नादच केला थेट ‘हे गाणं जसं वायरल झाले आहे. तसंच पुण्यातील औधमधील एका मोदी भक्तांने चक्क प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मंदिर थेट उभे करून ‘नावाला तुमच्या डिमांड आली, जिकडं तिकडं मोदी यांच्या मंदीराची चर्चा चालू झाली आहे’ असा संदेश दिला आहे. संपूर्ण देशात स्वातंत्र्यदिनाचे अमृत महोत्सवी वर्ष उत्साहाने साजरे होत असताना चक्क प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मंदिराची उभारणी करण्यात आली आहे .
पुण्यातील औंध गावात नरेंद्र मोदी यांच्या मंदिराची स्थापना केली आहे . या मंदिरात मोदी यांचा अर्धाकृती पुतळा उभारण्यात आला आहे . मोदींच्या कार्यावर आधारित काव्याची रचना करून तीही येथे मोठ्या फलकावर झळकावण्यात आली आहे . मोदींचे हे पुण्यातील पहिलेच मंदिर असून , देशपातळीवरही या प्रकारचे पहिलेच मंदिर असल्याचा दावा केला जातोय .
मयूर मुंडे असे मोदी यांचं मंदिर उभारणा-या भाजप कार्यकर्त्याचे नाव आहे . त्यांनी स्वतःची मालकी असलेल्या जागेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे हे मंदिर उभारले आहे . पुण्यातील औंध येथील ॲड . मधुकर मुसळे यांच्या संकल्पनेतून नरेंद्र मोदी यांचे मंदिर उभारण्यात आले आहे . दिवानशु यांनी हा पुतळा तयार केला असून यासाठी एक लाख 60 हजार रुपये खर्च झाले आहे . 15 ऑगस्ट 2021 रोजी औंधमधील ज्येष्ठ नागरिक के . के . नायडू यांच्या हस्ते मंदिराचे उद्घाटन करण्यात आले .