खळबळजनक ; पिंपरी चिंचवड पालिकेत अॅन्टी करप्शनची रेड ;’या’ लोकांना पोलिसांनी केली रंगेहाथ अटक
पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत पुण्याच्या लाचालुचपत प्रतिबंधक विभागाकडून आज (बुधवारी) मोठी कारवाई करण्यात आली असून स्थायी समिती सभापती नितीन ज्ञानेश्वर लांडगे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. लांडगे यांच्यासह त्यांचे पीए ज्ञानेश्वर पिंगळे, लिपिक अरविंद कांबळे आणि राजेंद्र शिंदे यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली आहे. अशी माहिती लाचलचुपत प्रतिबंधक विभागाकडून देण्यात आली आहे
पुणे अॅन्टी करप्शनचे अधीक्षक राजेश बनसोडे आणि अप्पर अधीक्षक सुहास नाडगौडा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सध्या कारवाई सुरू असल्याचं सांगितलं आहे. मात्र, पुणे अॅन्टी करप्शनने नऊ लाख रूपयांच्या लाच प्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेत मोठी कारवाई केली असल्याची खात्रीलायक माहिती आहे. नऊ लाखाचे लाच प्रकरण असल्याने आणि थेट मोठा मासा गळाला लागल्याने पिंपरी-चिंचवड आणि पुण्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. संबंधित व्यक्ती राजकीय पक्षाशी संबंधित आहे. अॅन्टी करप्शनचे पथक पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत ठाण मांडून बसले आहे. कारवाई सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे.
एका व्यक्तीने काल (मंगळवारी) संध्याकाळी 5 वाजता एक कंत्राटदार म्हणून स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांना भेटला व म्हणाला , ‘माझा विषय उद्याच्या स्थायी समितीच्या बैठकीत आहे, तो मंजूर करा तुम्हाला जे काही कमिशन पाहीजे आहे, मी ते देण्यास तयार आहे’ त्यानंतर नितीन लांडगे यांनी सदरील कमिशन हे स्विय सहाय्यक ज्ञानेश्वर पिंगळे यांच्याकडे देण्यास सांगितले त्यानुसार आज (बुधवार) सायंकाळी साडेचार वाजता कंत्राटदार, जो पंजाबी आहे, त्याने पिंगळे यांना खाली बोलावून कमिशनचे पैसे दिले, यावेळी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ त्यांना रंगेहाथ पकडले. चौकशी अंती स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, स्विय सहाय्यक ज्ञानेश्वर पिंगळे, अकाउंट राजेंद्र शिंदे, लिपिक विजय चावरिया, शिपाई अरविंद कांबळे यांना पोलिसांनी अटक केली.