महिला मूलनिवासी संघच्या वतीने बारामतीत माता रमाई आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
बारामती(वास्तव संघर्ष) :डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांची सहचारिणी रमाबाई आंबेडकर यांचा खडतर जीवन प्रवास पाहिला तर त्यागाची अस्सीम मुर्ती नजरेसमोर येते. कारण बाबासाहेब महान होऊ शकले त्यात रमाईच्या त्यागाचा मोलाचा वाटा आहे. त्यांचे शिक्षण आणि कुटुंब, राजकीय सामाजिक प्रवास आणि कौंटुंबिक जबाबदाऱ्या यांच्यात कायमचा दुवा होती ती त्यागमूर्ती कोटी जणांची माऊली माता रमाई यांची जयंती महीला मूलनिवासी संघ बारामतीच्या वतीने आज साजरी करण्यात आली.
कोकणातील वणंद गाव ते मुंबईतील राजगृहापर्यंतचा माता रमाई यांचा प्रवास हा जणू आजन्म कष्टांचाच आहे. गोवऱ्या विकून आणि फाटक्या लुगड्यात राहून संसाराचा गाडा ओढत या माऊलीने समाजकार्यासाठी बाबासाहेबांना नेहमीच सहकार्य केले.
अशा त्यागाच्या मूर्तीमंत स्मृतीस माता रमाईस जयंतीनिमित्त महीला मूलनिवासी संघ बारामती मार्फत त्रिवार वंदन करण्यात आले.
महिला मूलनिवासी संघ बारामती च्या बारामती अध्यक्ष ज्योती गायकवाड, दिपाली लोंढे, सुरेखा पोळ, भारत मुक्ती मोर्चा च्या अध्यक्ष अनिता शेलार , महामाता रमाई प्रतिष्ठानच्या संस्थापक तेजस्वी पोळ, अध्यक्षा प्रतिमा पोळ यांनी कार्यक्रमाचे नियोजन करत महिलांना मार्गदर्शन केले.
यावेळी संघटनेच्या कार्यकारीणी च्या सुनीता भोसले, संजीवनी सिताप, सोनल पोटे, ललिता सीताप,पूनम सावंत, बंटीदिदी सोनवणे यांनी कार्यक्रमात माता रमाई बद्दल आपली कृतज्ञता व्यक्त करत सद्य परिस्थिती मधील स्त्री प्रश्न बाबत आपले अमूल्य मत व्यक्त करुन कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला.