क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

मोक्का गुन्ह्यातील फरार नानासाहेब गायकवाड आणि त्यांच्या मुलाला कर्नाटक राज्यातून पोलिसांनी केली अटक

पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरी चिंचवड शहरातील प्रसिद्ध उद्योजक नानासाहेब गायकवाड आणि त्यांचा मुलगा गणेश गायकवाड यांना पुणे पोलीसांनी सापळा रचून अटक केली आहे. मोक्काच्या दुहेरी गुन्ह्यात फरार असलेल्या गायकवाड यांना कर्नाटक येथून पकडण्यात आले आहे . या दोघांवरही सुनेचा छळप्रकरणानंतर खंडणीचे गुन्हे दाखल झाले आहेत . तसेच पुणे आणि पिंपरी – चिचंवड शहर पोलीसांनी मोक्कानुसार त्यांच्यावर कारवाई केली आहे .

नानासाहेब शंकरराव गायकवाड , गणेश उर्फ केदार नानासाहेब गायकवाड , नंदा नानासाहेब गायकवाड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , गायकवाड पिता पुत्रांसह इतरांवर पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड पोलिसांच्या हद्दीत खंडणी आणि ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत . सुनेचा छळ केल्याप्रकरणी पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर गायकवाड कुटूबांवर जमीन लाटण्यासोबतच बेकायदा सावकारकीचे गुन्हे देखील दाखल आहेत .

गुन्हे दाखल झाल्यानंतर नानासाहेब गायकवाड , पत्नी नंदा आणि मुलगा गणेश फरार झाले होते . तर , पोलिसांनी यापूर्वी तिघांना अटक केली होती . त्यात मुलगी व जावई तसेच इतर एकाचा समावेश आहे . पण , नानासाहेब गायकवाड व मुलगा पसार झाले होते . प्रथम पिंपरी – चिचंवड पोलिसांनी याप्रकरणात गायकवाड यांच्यासह इतरांवर मोक्कानुसार कारवाई केली होती . त्यानंतर पुणे पोलिसांनी देखील त्यांच्यावर मोक्का कारवाई केली आहे . दरम्यान या तिघांचा शोध घेतला जात होता . त्यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त देसाई व त्यांच्या पथकाला तो कर्नाटक येथे असल्याचे माहिती मिळाली होती . त्यानुसार पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता , सहपोलीस आयुक्त डॉ . रविंद्र शिसवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त देसाई , सहाय्यक निरीक्षक चव्हाण , उपनिरीक्षक पंधरकर यांच्या पथकाने त्याला आज सायंकाळी कर्नाटक राज्यातून पकडले आहे . अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Share this: