क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

धक्कादायक ;शिवसेना विभाग प्रमुख अनिल पारचा व उद्योजक बबलू सोनकर यांच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला

पिंपरी (वास्तव संघर्ष ) :- महिनाभर निवडणुकीचा प्रचारसभा सुरु होत्या. या प्रचार सभांमध्ये भांडणे वादविवाद होतात. मात्र आज ऐन मतदानाच्या दिवशी कार्यकर्त्यांना उमेदवारांना मारहाण करून दहशत माजविण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. त्यामुळे लोकशाहीच्या या उत्सवाला मारहाणीचे गालबोट लागले आहे.

पिंपरीतील महायुती शिवसेनेचे उमेदवार अॅड गौतम चाबुकस्वार याचे कार्यकर्ते आणि शिवसेना विभाग प्रमुख अनिल पारचा व उद्योजक बबलू सोनकर यांच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे.


ही घटना सोमवारी (दि. २१ ) पिंपरी येथे घडली. यामुळे पिंपरीत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत

Share this: