क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

रिक्षाचा पाठलाग करून चोरटय़ांना चिंचवड पोलिसांनी केली अटक ; ६१ हजारांची तांब्याची भांडी केली हस्तगत

चिंचवड (वास्तव संघर्ष) :चोरी व मौजमजेसाठी वाहने चोरणा – या चोरटयांना चिंचवड पोलीसांनी अटक केली आहे. आरोपींकडून पोलिसांनी १ रिक्षा ७ मोटार सायकलीसह ६१ हजारांची तांब्याची भांडी हस्तगत केली .दोन आरोपींना चिंचवड पोलीसांनी अटक केली आहे.

इम्रान रहिम शेख (वय -१ ९ रा . वेताळनगर झोपडपटटी , चिंचवड ) अमर सुनिल वाघमारे( वय -१ ९ रा मोरया हौ . सोसा . रूम नं १०७ , बिल्डींग नं ०७ , चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चिंचवड पोलीस स्टेशन हद्दीत रात्रीच्या वाहन चोरी , घरफोडी यांना प्रतिबंध करण्यासाठी चिंचवड पोलीस पेट्रोलींगकरीत असताना रिव्हरव्युह हॉटेलजवळ त्यांना एक प्रायव्हेट नंबर प्लेटची ऑटो रिक्षा ( एम.एच १४ पी.ए ९ २२१) गाडीवर संशय वाटल्याने रिक्षा चालकास थांबविण्यास सांगितले असता त्यांनी रिक्षा थांबविली नाही . रिक्षाचा पाठलाग करून अडविले असता रिक्षामधून तिन मुले पळून जात असताना पोलिसांना दिसले यातील दोन मुलांना पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले . त्यांना रिक्षाच्या कागदपञाबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवा – उडवीची उत्तरे दिल्याने अधिक चौकशीसाठी पोलीस चौकीस आणुन रिक्षाची माहिती घेतली असता सदरची रिक्षा ही चोरीची असून त्याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात गु.र.नं ३१६/२०२० भा.दं.वि. कलम ३० ९ प्रमाणे गुन्हा दाखल आहे .अशी माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानंतर अटक आरोपींना विश्वासात घेवुन इतर ठिकाणी केलेल्या चोरीबाबत चौकशी केली असता त्यांनी चोरी करण्यासाठी , मौज मजा करण्यासाठी व फिरण्यासाठी चिखली , भोसरी , चिंचवड , वाल्हेकरवाडी भागातुन मोटार सायकली चोरल्याचे कबूल केले . त्यांचेकडून तपासात चोरी केलेल्या ०७ मोटार सायकली जप्त केल्या आहेत . तसेच त्यांनी अल्पवयीन मुलांच्या मदतीने चोरलेल्या रिक्षाचा वापरकरून चिंचवडेनगर येथून एका टेम्पोतून रात्रीच्या वेळेस तांबे व अॅल्युमिनीयमची भांडी चोरल्याचे कबुल केले . आरोपींनी चोरलेल्या रिक्षा व मोटार सायकलीबाबत विवीध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

सदरची कामगीरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त मंचक इप्पर, सहा पोलीस आयुक्त डॉ सागर कवडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे यांच्या मार्गदर्शना खाली तपास पथकाचे सहा पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव , पो हवा पांडुरंग जगताप , पो ना स्वप्निल शेलार , पोना रुषीकेश पाटील , पो ना विजयकुमार आखाडे , पो शि पंकज भदाणे , पो शि नितीन राठोड , पो शि गोविंद डोके , पो शि अमोल माने , पो शि सदानंद रूद्राक्षे यांनी केली आहे .

Share this: