बातम्यामहाराष्ट्र

नमो मंदिर रातोरात गायब ; मोदींभक्ताची थेट प्रधानमंत्री कार्यालयाकडूनच कानउघडणी

पुणे (वास्तव संघर्ष) :पुण्यातील औधमधील एका मोदी भक्तांने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मंदिर उभारले होते. आज अखेर हे मंदिर हटविण्यात आले आहे . मंदिर उभारल्याने थेट प्रधानमंत्री कार्यालयाकडूनच कानउघडणी केली त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त केली . त्यामुळे नरेंद्र मोदी यांचे मंदिर रातोरात कागदाने झाकून तो पुतळा भाजपा नगरसेविका अर्चना मधुकर मुसळे यांच्या कार्यालयात हलविण्यात आला आहे . भाजपाचे कार्यकर्ते मयुर मुंडे यांनी वरिष्ठांच्या सूचनांनंतर हा पुतळा हलविला आहे.

देशातील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे हे पहिलेच मंदिर असल्याचे दावा करण्यात आला होता . खास जयपूर येथून मोदींचा मार्वल पुतळा तयार करुन घेण्यात आला होता . यासाठी 1लाख 60 हजार रुपये खर्च आला होता मोदी यांच्या कार्यावर रचलेली कविता येथील फलकावर लावण्यात आली होती . मात्र , हे मंदिर उभारल्यापासून टीकाही झाली होती . त्यामुळेच थेट पंतप्रधान कार्यालयाकडून या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली होती . राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत सूचना केल्याची चर्चा होती . त्यामुळे मंदिर बांधणारे भाजपाचे कार्यकर्ते मयुर मुंडे यांनी वरिष्ठांच्या सूचनांप्रमाणे हा पुतळा काढला .

दरम्यान, अॅड . मधुकर मुसळे यांच्या संकल्पनेतून नरेंद्र मोदी यांचे मंदिर उभारण्यात आले होते . दिवानशु यांनी हा पुतळा तयार केला असून यासाठी एक लाख 60 हजार रुपये खर्च झाले आहे . 15 ऑगस्ट 2021 रोजी औंधमधील ज्येष्ठ नागरिक के . के . नायडू यांच्या हस्ते मंदिराचे उद्घाटन करण्यात आले होते .

Share this: