बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

शिवशाही व्यापारी संघाच्या युवराज दाखलेंनी भरला अपक्ष अर्ज

सकल मातंग समाज आणि बारा बलुतेदार समाजबांधवांचा पाठींबा

पिंपरी(वास्तव संघर्ष) – सकल मातंग समाज आणि बारा बलुतेदार समाजाच्या वतीने शिवशाही व्यापारी संघाचे संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे.

निगडी येथील डॉ. हेडगेवार भवन येथे निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली इदानी यांच्याकडे अर्ज सुपूर्द केला. यावेळी शेकडो कार्यकर्ते त्यांच्यासोबत उपस्थित होते.

दाखले हे शिवसेनेचे माजी पदाधिकारी असून मातंग-बहुजन समाजाचे तरुण नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. गेल्या काही वर्षांपासून त्यांनी पिंपरी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून जोरदार तयारी केली आहे. त्यामुळे दाखले हे इतर उमेदवारांपुढे आव्हान उभे करू शकतात असे मत राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.

Share this: