प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज भरण्याची मुदत पंधरा दिवस वाढवण्यात आली -महापौर उषा ढोरे
पिंपरी (वास्तव संघर्ष) :केंद्रीय गृहनिर्माण व शहरी गरीबी निर्मुलन मंत्रालयाकडील प्रधानमंत्री आवास योजनेच्या मार्गदर्शन सुचनांनुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत च – होली , रावेत , व बो – हाडेवाडी येथील आरक्षित जागांवर सर्वांसाठी घरे संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यात येत आहे . तथापि सदर योजनेकरिता अर्ज भरणेची मुदत ही दि .१७ / ० ९ / २०२० रोजी संपुष्टात येत आहे . तरी ही मुदत पुढील पंधरा दिवस वाढवण्यात आल्याची माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिका महापौर उषा ढोरे यांनी दिली आहे.
पिंपरी चिंचवड ही औद्योगिक व कामगार नगरी असून अनेक गोरगरीब कामगार हे पिंपरी चिंचवड शहरात वास्तव्यास आहेत . कोरोना विषाणूचे संकट व लॉकडाऊनमुळे बरेच उद्योग , व्यवसाय हे पूर्वपदावर न आल्याने ब – याच गोरगरीब कष्टकरी , कामगार व खाजगी नोकरदार वर्गास जीवन जगण्याची धात पडलेली आहे . तसेच सध्या रोजगार उपलब्ध नसल्याने त्यांची आर्थिक स्थिती खालावलेली आहे . तसेच सदर योजनेकरिता अर्ज भरण्यास नागरिकांना आधारकार्ड , पॅनकार्ड , मतदान ओळखपत्र , जात प्रमाणपत्र , उत्पन्नाचा दाखला , बँक खाते व इतर संबंधित कागदपत्रे तसेच र.रु .५,००० / – चा डी.डी. देणे आवश्यक आहे .
परंतु शहरातील बहुतांशी नागरिकांची सदर अर्जाची प्रक्रिया अद्याप पुर्ण झाली नसल्याने व अर्ज मुदतीत सादर करणेकामी अडचण निर्माण होत असल्याची बाब निदर्शनास येत होती . याची नोंद महापौर उषा ढोरे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना केली होती त्यानुसार प्रधानमंत्री आवास योजनेचे अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकानंतर पुढील पंधरा दिवस मुदतवाढ देण्यात आली आहे. आता प्रधानमंत्री आवास योजनेची शेवटची तारीख 2 आॅक्टोबर 2020 असणार आहे