पिंपरीत आरपीआय पक्षाला खिंडार,अजिज शेख भारीपमध्ये करणार प्रवेश?
आरपीआय वाहतूक आघाडी महाराष्ट्र अध्यक्ष अजीज शेख हे लवकरच रामदास आठवले यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द करणार आहेत
पिंपरी – चिंचवड मधील आरपीआय (आठवले गट) केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे खद्दे कार्यकर्ते समजले जाणारे तसचे दलित संघटनेतील मुस्लिम चेहरा समजला जाणारे आरपीआय वाहतुक आघाडी महाराष्ट्र अध्यक्ष अजिज शेख हे लवकरच भारीप मध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. आपल्या कार्यालयावरील आरपीआय ची आज रोजी पाटी काढून त्यांनी हे संकेत दिले आहेत.
याबाबत वास्तव संघर्ष शी बोलताना शेख म्हणाले की, गेली सहा वर्षे आरपीआय पक्षाला मी आणि माझ्या कार्यकर्त्यांनी संपुर्ण वेळ दिला दलित संघटनेतील मुस्लिम चेहरा म्हणून मला पाहीजे तेवढा सन्मान दिला जात नाही, पक्षातील अंतर्गत गटबाजीचा फटका शहरात पक्ष वाढीला पायबंद घालत आहे. त्यामुळे रामदास आठवले यांच्यावर सदैव प्रेम असेल परंतू पक्षात माझी घुसमट होत आहे. त्यामुळे मी आरपीआय पक्ष सोडणार आहे असे देखील ते म्हणाले.
दरम्यान, आरपीआय नंतर कोणत्या पक्षात जाणार? या प्रश्नाचे उत्तर देताना अजिज शेख म्हणाले ‘पक्षापेक्षा विचारधारेला मी मानणारा कार्यकर्ता आहे, पुर्वी मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षात होतो तेथील पदाधिका-यांशी माझी बोलणी सुरू आहे. माञ भारिप मध्ये जाण्यास मी इच्छुक आहे. भारीप अध्यक्ष अॅड: प्रकाश आंबेडकर यांनी मला संधी दिल्यास मी येत्या २८ जानेवारीला एच. ए मैदान पिंपरी येथे होणाऱ्या वंचित बहुजन आघाडी च्या कार्यक्रमात जाहीर प्रवेश करेन.