कौतुकास्पद :मुलीच्या मृत्यूनंतर मातापित्याने घेतला अवयव दानाचा निर्णय
पिंपरी(वास्तव संघर्ष ): पिंपरी गावातील बाबुराव नरे व शर्मिला नरे यांची मुलगी श्रुती बाबुराव नरे वय 17वर्षे हिचे काल दि: 17ऑगस्ट रोजी पिंपरी तील डाॅ. डी.वाय. पाटील रूग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. अचानक डोक्यात तीव्र स्वरूपाची डोकेदुखी झाल्याने ती चक्कर येऊन बेशुद्ध पडली. तिला तात्काळ डी.वाय. पाटील रूग्णालयात दाखल करण्यात आले. काही वेळाने ती कोमात गेली.
डॉक्टरांनी तिच्या डोक्यात मेंदूला रक्तस्राव खुप मोठ्या प्रमाणावर झाल्याने तिचा ब्रेन डेड झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तिचे बाकीचे सर्व अवयव पूर्णपणे कार्यरत होते. पण दुर्दैवाने तिचे निधन झाले. या नंतर तिच्या आई वडीलांनी जड अंतःकरणांनी अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आज अनेक श्रुती आपल्या मध्ये दिसणार आहेत.त्यांच्या या निर्णयाला सर्व स्तरातून पाठिंबा व कौतुक होत आहे.