सहकारी महिलेशी गैरवर्तन करणाऱ्या अधिकाऱ्यांला स्वच्छ प्रतिमेचे आयुक्त राजेश पाटील यांचा’ वरदहस्त’
पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आयुक्त राजेश पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर एक प्रामाणिक आयुक्त म्हणून त्यांची शहरातील सामान्य नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. स्वतःच्या फायद्यासाठी पुर्ण यंत्रणा वेठीस धरण्याचे काम महापालिका प्रशासनात कित्येक वर्षे ठाण मांडून बसलेल्या अधिका-यांची बदली करणे हा ऐतिहासिक निर्णय देखील त्यांनीच घेतला. एकिकडे आयुक्त राजेश पाटील यांनी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या तर दुसरीकडे काही अधिकाऱ्यांच्या बढती केलेल्या अधिका-याबद्दल प्रश्न निर्माण झाला आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील तत्कालीन पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता वादग्रस्त संजय कुलकर्णी यांनी आपली सहकारी महिलेशी गैरवर्तन केले होते.ही घटना सन 2018 साली झाली होती. पिडीत तरूणीने याबाबत तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. शहरातील विविध राजकीय सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकत्यांनी तसेच त्यावेळचे पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अॅड गौतम चाबुकस्वार यांनी त्या पिडीत तरूणीच्या न्यायासाठी आयुक्तांना पत्र दिले होते. त्यानंतर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी याच्यावर विशाखा समिती बसवून दोन महिन्यांचे वेतन आणि इंक्रीमेंट थांबवण्यात आले.
मात्र सहकारी महीलेशी लगट करणे तीच्याशी गैरवर्तन करणे अशा संजय कुलकर्णी यांना पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता वरुन थेट सहशहर अभियंता पर्यावरण विभाग अधिकारी पदी पदोन्नति दिल्यामुळे स्वच्छ प्रतिमेचे आयुक्त राजेश पाटील यांचा त्याच्यांवर वरदहस्त कसा काय ? याचीच चर्चा शहरात आणि पालिकेच्या वर्तुळात सुरू आहे.