बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी भाजपातर्फे अभिवादन

पिंपरी (वास्तव संघर्ष) :जातीव्यवस्था आणि अस्पृष्यतासारख्या समाजविघातक प्रवृत्तीविरोधात लढण्याची ताकद निर्माण करणारे जगातील एकमेवादित्य राजकीय व्यक्तीमत्व आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी पिंपरी-चिंचवड भाजपातर्फे अभिवादन करण्यात आले.

यावेळी भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे, प्रदेश महिला मोर्चा प्रदेश अध्यक्षा उमा खापरे, प्रदेश चिटणीस अमित गोरखे, नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी महपौर राहुल जाधव, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, बाबू नायर, विजय फुगे, अनु. जाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष मनोज तोरडमल, अनु. जाती मोर्चा प्रदेश चिटणीस कोमल शिंदे, अनु. जाती मोर्चा शहराध्यक्ष सुभाष सरोदे, महिला आघाडी प्रदेश कोषाध्यक्ष शैला मोळक, शहर उपाध्यक्ष समीर जावळकर, प्रदीप बेंद्रे, ओबीसी आघाडीचे सरचिटणीस कैलास सानप, कोमल काळभोर, सुभाष रणसिंग, युवामोर्चा सरचिटणीस तेजस्विनी कदम, मंडल अध्यक्ष महादेव कवितके, विजय शिनकर, नंदू भोगले, कविता हिंगे, रेखा कडाली, अनिल लोंढे, जयश्री मकवाना, कोमल गौडाळकर, शुभांगी कसबे, राधिका बोर्लीकर आदी उपस्थित होते.

आमदार लांडगे म्हणाले की, डॉ. राजा राम मोहन रॉय, महर्षी कर्वे, महात्मा फुले यांनी स्त्रियांना त्यांच्या हक्क मिळून देण्यासाठी भारत पारतंत्र्यात असतानाही प्रयत्न केले आणि ते मिळवूनही दिले. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांच्या हक्कांना घटनात्मकरित्या तरतूद करून कायदेशीर संरक्षण मिळवून दिले. डॉ. बाबासाहेब यांच्या या कृतीमागे त्यांचा स्त्रियांच्या हक्काप्रती असलेला विचार आजही समाजासाठी दिशादर्शक आहे

Share this: