‘सेक्स’ करण्यासाठी त्याने वापरले कुञीम लिंग; पती, सासूसह चौघांवर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
तसेच पतीने अनैसर्गिक शारिरीक संबंध ठेवून तिचा शारिरीक आणि मानसिक छळ करून लग्नामध्ये खर्च झालेले पाच लाख रुपये माहेराहून आणण्यास सांगितले. पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपासासाठी कन्नड पोलिसांकडे वर्ग केला आहे.
पिंपरी(वास्तव संघर्ष ):- भोसरी पोलीस ठाण्यात एक आगळा-वेगळाच गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा पत्नीने पतीविरोधात दाखल केला आहे. पती नपुंसक असून सुहागरात्रीपासूनच शरीरसंबंध ठेवताना पती कृत्रिम लिंग वापरत असल्याची तक्रार पत्नीने भोसरी पोलीस ठाण्यात केली आहे. तिच्या या आरोपामुळे पोलीस देखील चक्रावून गेले असून पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी पतीसह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.3
याप्रकरणी २८ वर्षीय महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात पती, सासु, चुलत सासरे आणि चुलत सासु विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचे २१ मे२०१९ रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील मुलासोबत लग्न झाले आहे. लग्न ठरवताना सासु, चुलत सासरा आणि चुलत सासुने मुलगा नपुंसक असल्याची माहिती लपवून ठेवली. तसेच पहिल्या रात्रीपासूनच शरीरसंबंध ठेवताना पती कृत्रिम लिंग वापरत असल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.