क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पैसे डबल करण्याच्या नादात व्यावसायिकाला लाखोंचा गंडा

पिंपरी (वास्तव संघर्ष) : पैसे डबल करण्याच्या नादात एका व्यावसायिकाला लाखोंचा गंडा घालण्यात आला आहे. ही घटना जानेवारी 2020 ते जून 2022 पर्यंत तपस्वी प्लाझा चिंचवड येथे घडली आहे.

संजय नागनाथ जाधव (वय-49 रा. रो. हाऊस नं-4 आकार रेसीडन्सी छत्रपती बँकेच्या मागे विशालनगर पिंपळे निलख पुणे) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शिवाजी किसन जाधव ( वय-55, रा. रहाटणी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिवाजी याने सॉईल प्रॉपर्टीज ॲन्ड इन्फ्रा इंडिया लिमीटेड या त्याच्या कंपनीत फिर्यादी संजय यांना दरमहा पंचवीस हजार रूपये गुंतवणुक केल्यास पाच वर्षांनंतर त्यांना एकवीस लाख पंचवीस हजार रूपये मिळतील असे भासवुन त्यांना दरमहा पंचवीस हजार रूपये गुंतवणुक करण्यास भाग पाडले त्यानंतर फिर्यादी संजय यांनी पाच वर्ष कालावधी पुर्ण झाल्यानंतर त्यांची गुंतविलेली रक्कम व त्यावरील लाभांश मागण्यासाठी आरोपी शिवाजी यांच्या तपस्वी प्लाझा चिंचवड येथील सॉईल प्रॉपर्टीज अॅन्ड इन्फ्रा इंडिया लिमीटेड कार्यालयात गेले असता, त्यांना वेळोवेळी सदर परताव्यासाठी पुढील तारखा देवुन त्यांचेकडुन गुंतवणुकीचे मुळ प्रमाणपत्र जमा करुन घेवुन त्यांना कोणत्याही प्रकारचा परतावा न देता कपंनीचे कार्यालय कायमचे बंद करुन फरार झाला व त्यानंतर फिर्यादी यांचेशी संपर्क न ठेवता फिर्यादी यांची व त्यांचेसारखे अनेक गुंतवणुकदारांची फवणुक केली.अधिक तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

Share this: