अखेर पिंपरीत साकारणार रमाई आंबेडकर स्मारक;१० सप्टेंबरला होणार भुमीपूजन
पिंपरी (वास्तव संघर्ष ) : पिंपरीतील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारी माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या पुतळा स्मारकाचे भूमिपूजन व भिमसृष्टीचे उदघाटन दिनांक १० सप्टेंबर रोजी होणार आहे. पिंपरी शहरातील मध्यभागी असलेले विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकात भिमसृष्टी व रमाई स्मारकाचे काम पुर्ण व्हावे यासाठी शहरातील विविध पक्षातील संघटनेतील आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता.
यामध्ये प्रामुख्याने लोकजनशक्ती पार्टी चे धुराजी शिंदे, भिमसंग्राम संघटनेचे अध्यक्ष राहुल वडमारे, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर ग्रुपचे अध्यक्ष सतीश कदम , सम्यक विद्यार्थी आंदोलनचे अध्यक्ष संतोष जोगदंड यांनी प्रशासनास पञव्यवहार केला तसेच अनेक आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी वेगवेगळी आंदोलने व एक दिवसीय धरणं आंदोलन केले या वेळी शहरातील सर्व राजकीय पक्ष व सामाजिक संघटना यांनी पाठिंब्याचे पत्र देखील त्यांना दिले होते .
माता रमाई भीमराव आंबेडकर यांनी बाबासाहेबांना संपूर्ण आयुष्यभर साथ दिली अतिशय खडतर जीवन प्रवासात समाजातील गोरगरीब जनतेच्या हितासाठी आयुष्य खर्ची केले त्यांचे उपकार विसरता येणार नाही. त्यांची प्रेरणा घेऊन येणारी पिढी सक्षम बनवण्यासाठी आज रमाई भीमराव आंबेडकर यांच्या स्मारकाची गरज होती..
आज मंगळवार दिनांक २७ ऑगस्ट रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महापौर राहुल जाधव , आयुक्त श्रावण हर्डीकर व सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांनी पिंपरीतील अॅटो क्लस्टर या ठिकाणी बैठकिचे आयोजन करण्यात आले होते.
सदरप्रसंगी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, विरोधी पक्षनेते नाना काटे, मनसे गटनेते सचिन चिखले, नगरसेवक सागर आंगोळकर, चंद्रकांत नखाते, बाबू नायर, स्थापत्य उद्यान विभागाचे कार्यकारी अभियंता सुनिल वाघुंडे, माजी उपमहापौर राजू मिसाळ, रामचंद्र माने, अंकुश कानडी, सामाजिक कार्यकर्ते अरूण भाऊ मैराळे, आनंदा कुदळे, बापू गायकवाड, संतोष जोगदंड, विलास गव्हाणे, दिलीप रणपीसे, विजय गेडाम, गिरीष वाघमारे आदी उपस्थित होते.