बातम्यामहाराष्ट्र

इयत्ता 9 आणि 11 वीची परीक्षा रद्द ;आता प्रतिक्षा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री यांच्या निर्णयाकडे

वास्तव संघर्ष आॅनलाईन – महाराष्ट्रात कोरोनामुळे 14 एप्रिलपर्यत लॉकडाऊन होता. माञ आता 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी वाढवण्याचे काल घोषीत केले होते. त्यातच सरसकट आठवीपर्यंत पास करण्याची घोषणा करण्यात आली. आता
दहावीचा भूगोल पेपर रद्द करण्यात आला असून  इयत्ता 9 आणि 11 वी परीक्षा होणार नाही. आधीचे सरासरी मार्क लक्षात घेत विद्यार्थ्यांना मार्क्स दिले जातील, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

राज्यात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असल्याने शालेय शिक्षण विभागाने हा निर्णय घेतल्याचे शालेय शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं आहे. याबाबत महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आपली भूमिका पुढील काही दिवसांत स्पष्ट करेल, असेही शिक्षण मंत्र्यांनी म्हटलं आहे.


माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यार्थीचा परीक्षा देण्याचा रस्ता मोकळा झाला असून विद्यार्थ्यांनी मोकळा श्वास घेतला आहे आता
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत हे राज्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यासंदर्भात मंगळवारी निर्णय देणार असून या निर्णयाकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान रिपब्लिकन विद्यार्थी सेनेने याआधी जून पासून नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थी पदार्पण करत असतात तेव्हा प्रवेश प्रक्रिया सुरू असते खर पहिलं तर विद्यार्थ्यांचे 90 दिवस  शिकवणी तासिका अजुन पूर्ण झाली नव्हती त्या मूळे विद्यार्थ्यांचे 90 दिवसाचे शिकवणी सत्र अजुन पूर्ण झाले नव्हते त्यामुळे विद्यापीठाने परीक्षा घेणे चुकीचं ठरेल.तसे झाल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल बहुसंख्य विद्यार्थी नापास होतील त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे.म्हणून विद्यार्थ्यांना आधिच्या मार्कची सरासरी करून सरसकटपणे पास करावे असे निवेदन मंञी उदय सामंत यांना दिले आहे.

Share this: