तुषार हिंगे यांचा उपमहापौर पदाचा राजीनामा ; हिंगे यांच्या राजीनाम्यानंतर शहराध्यक्षांची पहिली प्रतिकिया

पिंपरी (वास्तव संघर्ष) :- पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेचे उपमहापौर तुषार हिंगे यांनी ( बुधवारी ) राजीनामा दिला . महापौर उषा ढोरे यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला . प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानुसार हिंगे यांनी राजीनामा दिला हा राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहे .

प्रभाग क्रमांक दहा शाहूनगर , म्हाडा , संभाजीनगर प्रभागातून तुषार हिंगे भाजपच्या चिन्हावर निवडून आले आहेत . पहिल्यांदाच ते निवडून आले होते . भाजपने त्यांना क्रीडा समितीचे सभापतीपद देखील दिले होते . सभापती असतानाच 22 नोव्हेंबर 2019 रोजी हिंगे यांना उपमहापौरपद देखील मिळाले . एकाचेवळी त्यांच्याकडे दोनही पदे होती .

उपमहापौर होऊन त्यांना 11 महिने पूर्ण झाले होते . उपमहापौर हिंगे यांच्या कार्यपद्धतीविषयी तक्रारी होत्या . या तक्रारी काही जणांनी भाजप प्रदेशाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे केल्या होत्या . त्याची दखल घेत प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी भाजप शहराध्यक्ष , आमदार महेश लांडगे यांना फोन केला . यावेळी हिंगे यांचा उपमहापौरपदाचा तत्काळ राजीनामा घेण्याची सूचना केली होती . त्यानुसार हिंगे यांनी पदाचा राजीनामा महापौरांकडे दिला

दरम्यान, भाजप शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी तुषार हिंगे यांच्या राजीनाम्यानंतर पहिली प्रतिकिया दिली आहे ते म्हणाले, शहराचे उपमहापौर तुषार हिंगे यांनी आपल्या कार्यकाळात लक्षवेधी कामगिरी केली. पण, पक्षाच्या सर्व नगरसेवकांना पद वाटपात समान न्याय मिळावा, असे सूत्र ठरले होते. त्यानुसार एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांनी राजीनामा दिला आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी दिली आहे.

कोरोना काळात यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात हिंगे यांनी ‘अटल थाळी’ सुरू केली होती. ‘कम्युनिटी किचन’ च्या गरजू नागरिकांना अन्न वाटप केले होते. प्रभागासह शहरातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी कायम सकारात्मक भूमिका घेतली, असेही लांडगे यांनी म्हटले आहे.

Share this: