क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरी चिंचवड शहरातील दापोडीत एका तरुणाचा तीन जणांनी केला खून ;आरोपींना पोलिसांनी केली अटक

पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी परिसरात दारू पिताना किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणातून तिघांनी मिळून एका तरुणाचा खून केला. ही घटना गुरुवारी (दि. 18) दुपारी हॅरिस ब्रिजखाली दापोडी येथे घडली.

याप्रकरणी मिलिंद चंद्रकांत आल्हाट (वय 24), अनिकेत उर्फ डुल्या राजेंद्र गायकवाड (वय 29), आशिष दयानंद कोल्हे (वय 21, रा. सिद्धार्थ नगर, दापोडी)या आरोपींना अटक करण्यात आली आहे.

अजय शशिकांत सूर्यवंशी (वय 25, रा. दापोडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून नितीन सयाजी शिंदे (वय 38, रा. सिद्धार्थ नगर, दापोडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि मयत अजय हे एकमेकांचे मित्र होते. गुरुवारी दुपारी अडीच वाजता ते दापोडी येथे हॅरीस ब्रिजखाली दारू प्यायला बसले. दारू पिण्याचा त्यांचा कार्यक्रम सव्वा पाच वाजेपर्यंत चालला.दरम्यान, मयत अजय याने अनिकेत गायकवाड याचा मोबाईल फोन घेतला. या कारणावरून तिघा आरोपींनी अजयला दगडावर डोके आपटून तसेच दगडाने ठेचून ठार मारले. खून केल्यानंतर अजयच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह फरफटत मुळा नदीच्या पात्रात नेऊन टाकला.पोलिसांना घटनेची माहिती मिळताच भोसरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत आरोपी घटनास्थळावरून पळून गेले होते. पोलिसांनी अजयचा मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. पोलिसांचे एक पथक आरोपींच्या मागावर गेले. काही वेळेतच पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत

Share this: