क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पोलीस आयुक्तांशी आपले डायरेक्ट कनेक्शन..असे म्हणून खंडणी मागणाऱ्या आरोपींना अटक

पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या नावाचा दबदबा शहरात असल्याने या संधीचा गैरफायदा घेऊन आरोपीने सामान्य नागरिकांकडून खंडणी वसूल केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या आरोपींना स्वतः पोलीस आयुक्त यांनी वेशांतर करून पकडले आहे.

रोशन बागुल, गायत्री बागुल, पुजा माने, ज्ञानेश्वर (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही) , अजित होके( रा. त्रिवेणीनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत विन्सेंट अलेक्झडर जोफेस यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. 26)रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पुना गेट हॉटेल भक्ती शक्ती चौकाजवळ फिर्यादी विन्सेंट यांनी आरोपी रोशन बागुल याला खंडणीचे पैसे घेण्यासाठी बोलवले त्यानुसार आरोपी रोशन बागुल याने फिर्यादी विन्सेंट यांच्याकडून एक लाख रुपये घेतले, त्यानंतर आरोपी ज्ञानेश्वर व आरोपी अजित होके आले नाही का? ते कुठे आहेत? असे विचारले असता ते हॉटेलच्या पार्किंगमध्ये थांबल्याचे त्याने फिर्यादी विन्सेंट यांना सांगितले. त्याचवेळी हॉटेलमध्ये दबा धरलेल्या पोलीसांनी त्यांना ताब्यात घेतले इतर दोन साथीदार पळुन गेले.

दरम्यान आरोपी यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश हे आमच्या ओळखीचे असून आम्ही जमिनीचे मॅटर सॉल करतो त्यांचे बॉस विश्वास नांगरे पाटील यांच्याशी आमची चांगली ओळख आहे, मी त्यांचे जमीनीचे कामे केली आहेत. अशी बतावणी आरोपी रोशन बागुल याने केली तसेच महाराष्ट्र पोलीस हेल्पर्स असे लिहलेले व महाराष्ट्र पोलीसचा लोगो असलेले बनावट आय कार्ड तयार करून पोलीस दलाचा सदस्य असल्याचे भासवुन त्याने खंडणी वसूल केल्याचे उघडकीस आले आहे.

Share this: