चिखलीमध्ये नागरिकांसाठी सार्वजनिक पाणपोई चे उद्घाटन
चिखली (वास्तव संघर्ष) : उन्हाची तीव्रता वाढत चालली असून येत्या मे महिन्यात ही तीव्रता अधिक होण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांची तहान भागविण्यासाठी मनोजभाऊ जरे युवा मंच यांच्या सहकार्याने व विश्वनाथ उर्फ मनोज भाऊ जरे यांचा वतीने साई मंदिर मोरेवस्ती,म्हेत्रे वस्ती चौक,सावतामाळी मंदिर ताम्हाणे वस्ती,गणेश मंदिर सावकार चौक व मोरया सोसायटी मोरेवस्ती या ठिकाणी “सार्वजनिक पाणपोई ” सारख्या सुंदर उपक्रमाचा लोकार्पण सोहळा सर्व नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा झाला.
विशेष म्हणजे या लोकार्पण सोहळ्याचे उदघाट्न कोणत्याही मोठ्या नेत्यांच्या व नामवंत व्यक्तीच्या हस्ते न करता परिसरातील जेष्ठ नागरिक व माता भगिनी यांच्या हस्ते केल्याने सर्वत्र मनोज भाऊ जरे यांच्या साध्या आणि सरळ स्वभावाच्या चर्चा रंगल्या होत्या.दरम्यान, प्रभाग क्र 13 मधील मोरे वस्ती,ताम्हाणे वस्ती,म्हेत्रे वस्ती मधील जेष्ठ नागरिक,शालेय विद्यार्थी, छोटे व्यावसायिक, आणि वाटसरुंची तहान या पाणपोईमुळे भागणार असून परिसरातील सर्व नागरिकांनी व वाटसरूंनी या स्तुत्य उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले.
यावेळी नारीशक्ती महिला मंच अध्यक्षा निलीमाताई मनोज जरे, अलकाताई मोरे,विद्याताई शेवाळे,पौर्णिमा शिंदे, अनिता शेळके, अर्चना जरे,मधुरा चव्हाण, विमल मासाळ, पुनम गुंड, सुवर्णा जरे,रेणुका शिंदे, छाया कदम, गुजर ताई ,व तसेच मा. राजू भाऊ माने, दीपक गिरी, हनुमंत कवितके, संजय ताम्हाणे, हनुमंत म्हेत्रे, राजू म्हेत्रे,विपुल म्हेत्रे, प्रमोद ताम्हाणे, गणेश ताम्हाणे,अनिल धन्ने ,काकासाहेब क्षीरसागर,नागेश नलावडे,गणेश गायकवाड,शिवाजी म्हेत्रे, पाटील महाराज, सानप ,जीवन बोराडे, प्रकाश गिरी ,सुभाष तिकटे सर आदी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मनोजभाऊ जरे युवा मंचच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आयोजन केले होते.