पिंपरीत एकावर कोयता आणि चाॅपरने खुनी हल्ला
पिंपरी (वास्तव संघर्ष) :जुने भांडण लोकांना का सांगतो असे म्हणून कोयता चाॅपर आणि बांबूने एकाला बेदम मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि.20) रोजी पिंपरीतील मिलिंदनगर वसाहत एफ बिल्डींगच्या पाकींग मध्ये घडली आहे.
राहुल बापुराव टोणपे( वय-26, रा. सुभेदार रामजी आंबेडकर मिलींदनगर वसाहत पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तन्वीर युसुफ-घोडेवाला (वय-28, रा. काळेवाडी ) अतुल पवार (वय-28 रा. पिंपरी) विशाल पवार (वय-31, रा. पिंपरी ) अक्षय बेलने (वय-21 पूर्ण पत्ता माहिती नाही ) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी राहूल हे पिंपरीतील मिलींदनगर येथील एफ बिल्डींगच्या पाकींगमध्ये उभा असताना यातील आरोपींनी फिर्यादी राहूल यांना जून्या भांडणाचे सर्वांना सांगतोस काय असे म्हणुन फिर्यादी राहूल यांना शिवीगाळ करून धमकावून जीवे मारण्याच्या उद्देशाने कोयता चाॅपरसारखे हत्यार व बांबुने बेदम मारहाण करत जखमी केले. तसेच मोठमोठ्याने शिवीगाळ करीत व त्याचे हातातील कोयता हवेत फिरवून जर कोणी सोडविण्यास मधे आला तर त्याला सुद्धा खल्लास करतो असे धमकावुन दहशत निर्माण केली. पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.