क्राईम बातम्याबातम्यामहाराष्ट्रमाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरी चिंचवडच्या ‘त्या’ बोगस पत्रकाराचा झाला भांडाफोड

पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरी चिंचवड महानगपालिकेत बोगस पत्रकारांमुळे अधिकारी त्रासले आहेत. त्यामुळे आता नोंदणीकृत वृत्तपत्र व माध्यमांच्या पत्रकारांचेच हुबेहूब नाव वापरून बोगस पत्रकारीता करत पत्रकारितेच्या माध्यमातून पैसे  कमवण्यासाठी एका बोगस पत्रकाराने अनोखी शक्कल लावली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये बहुजन हिताय या नावाने युट्युब चॅनल चालवणा-यावर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे.

भिमराव हर्षवर्धन तुरुकमारे (राहणार.पिंपरी), त्याचे सहकारी कार्यकारी अध्यक्ष तुषार राम वैद या बोगस पत्रकारावर पिआरबी अॕक्टनुसार कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आले आहे.

साप्ताहिक बहुजन हितायचे मुळ संपादक बबन विश्वनाथ सोनवणे यांनी पुणे जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, जिल्हा माहिती अधिकारी आणि मनपा आयुक्त यांना कार्यवाही संदर्भात पत्रव्यवहार केला आहे.या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, माझे वर्तमानपत्राचे शिर्षक “बहुजन हिताय” या नावाखाली जनतेला बनवुन जाहिरात घेणे, नियुक्तीच्या व वृत्त प्रकाशित करण्याच्या नावाखाली निधी गोळा करून व बेकायदेशिर वर्तमानपत्र चालवणाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून पीआरबी अॅक्टनुसार कायदेशिर कारवाई करावी.आपले कार्यक्षेत्रात माझ्या वर्तमान पत्राचे शिर्षक बहुजन हिताय बेकायदेशिर रीत्या चालवत असल्याने सदर प्रकरणात संपूर्ण अधिकार आपणांस असल्याने सेवेत विनंती पुर्वक अर्ज करतो की, मला वर्तमान पत्राचे नोंदणी कार्यालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांनी सन 2007 मध्ये कालावधी साप्ताहीक करीता बहुजन हिताय हे शिर्षक मंजुर केले असुन याचे शिर्षक कोड क्रमांक MAHMAR31543 असे असून याचे नोंदणी क्रमांक RNI NO. MAHMAR/2007/21424 असा आहे. सदर वर्तमान पत्राचा मालक, मुद्रक, प्रकाशक, संपादक मी बबन विश्वनाथ सोनवणे, राहणार व प्रकाशन स्थळ फुलेनगर, उस्मानपुरा, छत्रपती संभाजीनगर असे आहे. तर सदर बहुजन हिताय हे वर्तमान पत्र छत्रपती संभाजीनगर येथून शासन मान्य यादीवरही आहे.

परंतू याबाबत सोशियल मिडीया, पैठण क्राइम अपडेट व इतर सोशल मिडीयावर सदर बहुजन हिताय या शिर्षक वापरून  भिमराव हर्षवर्धन तुरूकमारे,, रा. बौध्दनगर येथील रहिवाशी यांनी बहुजन हिताय हि संघटना, पक्ष, सामाजिक संस्था नाही यामुळे सदर वर्तमानपत्राचे कार्यकारी अध्यक्ष, व विविध अध्यक्षपद व पदाधिकारीयांची नेमणुक करण्यात येत आहे. परंतू बहुजन हिताय या शिर्षकाच्या नावाने पीआरबी अॅक्टनुसार असे कोणतेही पदे वर्तमानपत्रात नसतात. तसेच बहुजन हिताय ह्या शिर्षकाच्या नावाखाली जाहिराती व या नियुक्तीच्या नावाखाली निधी गोळा केला जात आहे. तसेच अनेक बड्या नेत्यांचे वृत्त प्रकाशित करून निधी गोळा केला जात असण्याची शक्यता आहे.भिमराव तुरुकमारे  त्यांचे सहकारी कार्यकारी अध्यक्ष तुषार राम वैद्य या दोघांनी संगणमताने याबाबत पी. आर.बी अॅक्टचे नियम पायदळी तुडवले आहेत त्यामुळे त्याच्यावर कार्यवाहीची मागणी केली आहे.

सध्या पिंपरी चिंचवड शहरात पत्रकार म्हणून अनेक जण वावरत आहेत. ‘मी संपादक आणि पत्रकार आहे’ असे सांगून अधिकाऱयांवर दबाव घालण्याचे व पैसे वसूल करण्याचे प्रयत्न केले जातात, असा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे आता जे बोगस पत्रकार आहेत. त्यांना आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी व पोलीस अधिकाऱयांनी बैठक घेऊन त्यांना बंदी घालावी असे नागरिक म्हणत आहेत.

Share this: