ड्रीम 11 वर करोडपती झालेल्या त्या पोलीसावर होणार कार्यवाही
पिंपरी (वास्तव संघर्ष): पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील उपनिरीक्षकाला ड्रीम 11 या फॅनटशी अॅपवर तब्बल दीड कोटींचे बक्षीस लागले होते . त्यामुळे या फॅनटशी अॅपची शहरात एकच चर्चा होत आहे.
सोमनाथ झेंडे असे हे बक्षीस जिंकणाऱ्या उपनिरीक्षकाचं नाव आहे. ते पिंपरी- चिंचवड पोलीस मुख्यालयात कार्यरत असतात.
एकिकडे सरकार अशा ऑनलाईन गेमवर बंदी घालण्याचा प्रयत्न करत आहे तर दुसरीकडे ऑनलाईन गेममध्ये पोलीसांनी गेम खेळून दिड कोटीची लाॅटरी जिंकल्यामुळे त्यांच्यावर टिका देखील होत होती. मात्र आता सोमनाथ झेंडे यांना ही लाॅटरी महागात पडणार असे दिसत आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश माने यांनी याबाबत सांगितले की प्रशासकीय तसेच कायदेशीर बाबी तपासून पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांचेवर कारवाई करण्यात येईल. चौकशी पोलीस उपायुक्त गोरे मॅडम यांचेकडे देण्यात आली आहे. चौकशी नंतर कारवाई बाबत निर्णय घेण्यात येईल.
दरम्यान सोमनाथ झेंडे यांनी गेल्या दोन ते तीन महिन्यापासून ड्रीम इलेव्हन खेळण्यास सुरू केली होती. त्यांनी बांगलादेश विरुद्ध इंग्लंड या क्रिकेट सामन्यावरती ड्रीम इलेव्हन ची टीम तयार केली ती टीम एकनंबरवर आली होती त्यामुळे त्यांना दीड कोटींचे बक्षीस लागले होते .