दादर स्टेशनला डाॅ.बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस नाव नको-प्रकाश आंबेडकर
मुंबई-येथील दादर या भागाला ऐतिहासिक महत्त्व असून अशा ऐतिहासिक महत्त्व असलेल्या ठिकाणांची नावे बदलू नये, अशी भूमिका भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मांडली आहे.दादर येथील नामांतराला प्रकाश आंबेडकर यांचा विरोध आहे
दादर रेल्वे स्टेशनला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे अशी गेल्या २० ते २५ वर्षांपासून मागणी होत आहे. यंदा भीम आर्मी यासाठी आक्रमक झाली आहे. ६ डिसेंबरपूर्वी दादर स्थानकाचे नामांतर करावे, अशी मागणी करणारे निवेदन भीम आर्मीने रेल्वे प्रशासनाला दिले होते. गुरुवारी सकाळी भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी दादर स्थानक परिसरात ठिकठिकाणी पत्रके लावून स्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस हे नाव द्यावे, अशी मागणी केली होती.
मध्य रेल्वेवरील दादर स्टेशनला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी भीम आर्मीने केली असतानाच भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी या नामांतरास विरोध दर्शवला आहे
दरम्यान या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी या वादावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले’ मुंबईला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. सात बेटांचे हे शहर असून दादर, माहीम, कुलाबा अशा ठिकाणांचे नाव बदलू नये. नव्या पिढीसमोर या जागांचे ऐतिहासिक महत्त्व आले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.