महाराष्ट्र

एमआयएम ही भाजपाची ‘बी टीम – अशोक चव्हाण|

अकोला : येथे चौथ्या टप्प्यातील जनसंघर्ष यात्रेच्या सभेला संबोधित करताना माजी मुख्यमंत्री तथा कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले ‘भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत आघाडी करून त्यांना काँग्रेस महाआघाडीत सहभागी करण्यासाठी चर्चा सुरू आहे, मात्र त्यांच्यासोबत महाआघाडीत नव्याने सामिल झालेल्या एमआयएम पक्ष आम्हाला चालणार नाही कारण एमआयएम ही भाजपाची ‘बी टीम’ असून त्या पक्षाच्या हेतूवरच शंका आहे.

भाजपाला पराभूत करण्यासाठी समविचारी पक्षांना एकत्र घेऊन निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट करत त्यांनी महाआघाडीत सहभागी होण्यासाठी शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यासह प्रकाश आंबेडकर यांच्यासोबतही चर्चा सुरू असल्याचे चव्हाण यांनी सांगितले..

अकोला येथे झालेल्या सभेला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आ. आशिष देशमुख उपस्थित होते

Share this: