क्राईम बातम्याबातम्यामहाराष्ट्रमाझं पिंपरी -चिंचवड

२५ हजार रुपयांची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकाला रंगेहात पकडले

पुणे :(वास्तव संघर्ष) – पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपनिरीक्षकाला २५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे . लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी ही कारवाई केली आहे . मिलन कुरकुटे ( वय ३२, पोलीस उपनिरीक्षक , हिंजवडी पोलीस ठाणे )असे लाच घेताना पकडलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे . याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे .

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार , तक्रारदार व्यक्तीने हिंजवडी पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीच्या गुन्ह्यासंदर्भात फिर्याद दाखल केली होती . या गुन्ह्यामध्ये बँकेच्या अधिका – यांना आरोपी करण्यासाठी आरोपी मिलन कुरकुटे याने तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांची लाच मागितली . तडजोडीनंतर २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना आरोपी कुरकुटे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले . या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात

Share this: