क्राईम बातम्यामहाराष्ट्र

बनावट जात प्रमाणपत्र भोवलं ;जयसिद्धेश्वर स्वामी यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

वृत्तसंस्था सोलापूर (वास्तव संघर्ष) – बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणी सोलापूरचे भाजप खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्याविरोधात सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . भाजप खासदार महास्वामी यांनी लोकसभा निवडणुकीत बनावट जातप्रमाणपत्र दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे . याप्रकरणी महास्वामी यांच्या विरुद्ध अक्कलकोट तहसीलदारांनी सोलापूर न्यायालयात दाखल केलेल्या फिर्यादीवर सुनावणी झाली . त्यावेळी न्यायालयाने १५६ / ३ प्रमाणे पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास करण्याचे आदेश दिले . न्यायालयाच्या आदेशानंतर सदर बझार पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

डॉ . जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांचे सदस्यत्व रद्द होवून लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर होवू शकते . अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातून २०१९ च्या निवडणुकीत खासदार डॉ . जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी हे भारतीय जनता पार्टी कडून विजयी झाले आहेत . खासदार महास्वामी यांच्या जात प्रमाणपत्रबद्दल प्रमोद गायकवाड , मिलिंद मुळे व विनायक कंदकुरे यांनी तक्रार केली होती . या तक्रारीनुसार जात पडताळणी समितीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी करून अहवाल सादर केला आहे .

प्रमोद गायकवाड , मिलिंद मुळे व विनायक कंदकुरे यांनी नुरंदस्वामी गुरुबसय्या हिरमठ ऊर्फ खासदार डॉ . जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांचे जात प्रमाणपत्र बनावट असल्याची तक्रार करत याबाबतचे पुरावे ही दिले होते . या सखोल पुराव्याच्या आधारे समितीने चौकशी केली असता लिंगायत हा पंथ असून अनुसूचित जाती पैकी नाही . बेडा जंगम ही जात लिंगायत पंथ समूहातील नसून वेगळी असल्याचे निरीक्षणही या अहवालात नोंदविण्यात आले  . 

Share this: