बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

वास्तव संघर्ष बातमीचा ईपॅक्ट : अखेर मागासवर्गीय डॉ .पवन साळवेनां मिळाला न्याय

पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ . पवन साळवे हे मागासवर्गीय समाजाचे असल्याने त्यांना वित्तीय अधिकार मिळू नये म्हणून गेली चार महिने त्यांचा विषय स्थायी समितीत तहकूब ठेवला होता. याबाबत सविस्तर वृत्त वास्तव संघर्ष ने दिनांक ७ फेब्रुवारीला प्रसिद्ध करण्यात आले होते. या वृत्ताची दखल घेऊन आज रोजी त्यांना वित्तीय अधिकार देण्यात आले आहे. भाजपचे नगरसेवक व स्थायी समितीचे विदयमान अध्यक्ष विलास मडेगिरी यांनी मागासवर्गीय समाजातील पवन साळवे यांच्यावर जातीयवादी भूमिकेतून अन्याय केला होता.

वास्तव संघर्ष बातमीनंतर महापालिकेचे अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी २८ फेब्रुवारी २०२० ला मंजुरी देण्यात आली आहे . त्यानुसार डॉ . पवन साळवे यांना २५ लाखांपर्यंत खरेदी व निविदा प्रक्रिया त्यांना २५ लाखांपर्यंत खरेदीसह विविध अधिकार प्रदान करण्यात राबविण्याचे वित्तीय अधिकार देण्यास आयुक्तांनी मान्यता दिली येणार आहेत . एकूण २५ लाखांपर्यंत खरेदी किंवा निविदा प्रक्रिया आहे . त्या प्रस्तावाला अखेर , २ महिन्यानंतर स्थायी समितीने राबविणे , कामाचा आदेश देणे , करारनान्यावर स्वाक्षरी करणे , मंजुरी दिली आहे . डॉ . साळवे यांना वैद्यकीय विभागप्रमुख म्हणून बिले मंजूर करणे आदी अधिकार त्यांना देण्यात येणार आहेत .

वंचीत बहुजन आघाडीने घेतला होता पुढाकार

पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ . पवन साळवे हे मागासवर्गीय समाजाचे असल्याने त्यांना वित्तीय अधिकार मिळू नये म्हणून गेली चार महिने त्यांचा विषय तहकूब ठेवणारे भाजपचे नगरसेवक व स्थायी समितीचे विदयमान अध्यक्ष विलास मडेगिरी यांची यावरून जातीयवादी मानसिकता समोर आली असून जातीयवादी मडेगिरी यांची स्थायीच्या अध्यक्षपदावरून कार्यकाळ संपण्यापूर्वीच हकालपट्टी करा,व त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात यावे .अशा मागणीचे निवेदन वंचीत बहुजन आघाडी चे पिंपरी चिंचवड युवकाध्यक्ष गुलाब पानपाटील यांनी तत्कालीन भाजपचे पक्षनेते एकनाथ पवार यांना दिले होते .यावेळी राजुभाई शेख, रमेश गायकवाड, शरद वाघमारे, अमोल जावळे, अविराज कालेकर, बाबासाहेब अंकुटे, जिवन पवार, इम्तियाज खान आदी उपस्थित होते

Share this: