ज्येष्ठ समाजसेवक मानव कांबळे यांचा नागरी सत्कार;मेधा पाटकर, डॉ. बाबा आढाव यांची उपस्थिती
पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवड शहरातील जेष्ठ समाजसेवक मानव कांबळे यांच्या ६१ व्या वाढदिवसाच्या निमित्त पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने त्यांचा भव्य नागरी सत्कार नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रणेत्या मेधाताई पाटकर यांच्या हस्ते व कष्टकऱ्यांचे नेते बाबा आढाव यांच्या अध्यक्षतेखाली आचार्य अत्रे रंगमंदिर संत तुकाराम नगर , पिंपरी याठिकाणी दिनांक १२ मार्च रोजी सायंकाळी ५. ००वा. हा कार्यक्रम होणार आहे.
कार्यक्रमास ज्येष्ठ विचारवंत गजानन खातू ,स्वराज अभियान महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस संजीव साने ,सर्वहारा जनआंदोलनाच्या वतीने उल्का महाजन, एस एम जोशी फाऊंडेशनचे विश्वस्त सुभाष वारे, कामगार नेते डॉ.अजित अभ्यंकर ,जन आंदोलनाच्या नेत्या ॲड. सुरेखा दळवी, कामगार नेते दिलीप पवार, किशोर ढोकले , डॉ. कैलास कदम, यशवंत भोसले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर माई ढोरे, खासदार श्रीरंग बारणे, खा. अमर साबळे ,आमदार लक्ष्मण जगताप, आ.महेश लांडगे, आ. अण्णा बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
या वेळी मानव कांबळे यांच्या जीवनावरील ‘संघर्षशील मानव’ या गौरव ग्रंथाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. शहरातील सर्व कामगार ,कष्टकरी, नागरिक, सामाजिक संघटना व संस्था यांच्यावतीने त्यांच्या सामाजिक कार्याचा बहुमान म्हणून त्यांना समाज रत्न पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे अशी माहिती मानव कांबळे नागरी सत्कार समिती पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी दिली