क्राईम बातम्याबातम्यामहाराष्ट्रमाझं पिंपरी -चिंचवड

‘बाजीगर’ चित्रपटाची कथा आणली वास्तवात आणि तो बनला कंपनीचा मालक 

पिंपरी (वास्तव संघर्ष): 1993 साली प्रदर्शित झालेला शाहरुख खानचा  बाजीगर चित्रपट तुम्हाला आठवत असेल त्या चित्रपटात शाहरुख कंपनीचा मालक मदन चोप्रा यांच्या अनुपस्थितीत सर्व अधिकार आपल्या हातात घेवून चोप्रा इंडस्ट्रीजला शर्मा इंडस्ट्रीज बनवून  मालकाची फसवणूक करतो असाच काहीसा प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये उघडकीस आली आहे. पिंपरीतील मोरवाडी येथील फाल्कोई मोटर्स प्रा. लिमिटेड कंपनीचे कामकाज सुरळीत सुरु ठेवण्यासाठी दिलेल्या अधिकारांचा गैरवापर करून महिलेच्या बनावट सह्या करून 92 लाख 98 हजार 900 रुपयांची फसवणूक एकाने  केली आहे. हा प्रकार सन 2013 ते सन 2021 या कालावधीत घडला आहे.

याप्रकरणी महिलेने  पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

राकेश किमतीलाल धवन उर्फ राकेशकुमार धवन (वय 54, रा. अमेरिका), दीपक अंकुश क्षीरसागर (वय 37, रा. जाधववाडी, चिखली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या भारताबाहेर असताना त्यांनी त्यांच्या कंपनीचे कामकाज सुरळीत सुरु ठेवण्यासाठी त्यांनी आरोपींना अधिकार दिले होते. त्याचा गैरवापर करून आरोपींनी फिर्यादी यांच्या गैरहजेरीत फाल्कोई मोटर्स कंपनीच्या सन 2016 ते 2018 या सालच्या जनरल बोर्ड मिटिंगमध्ये फिर्यादी या हजर असल्याचे दाखवले. आरोपी दीपक क्षीरसागर याने फिर्यादी यांची खोटी सही करून फिर्यादी यांचा प्रतिनिधी म्हणून स्वतःची निवड करून घेतली. सन 2015 ते 2018 च्या ऑडिट रिपोर्ट, बॅलन्सशीट, प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट आदी कागदपत्रांवर फिर्यादी यांच्या खोट्या सह्या करून ती सर्व कागदपत्रे भारत सरकारच्या कार्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड केले. त्याचा वापर कंपनीच्या कामकाजासाठी करून खोटे दस्तऐवज तयार करत 92 लाख 98 हजार 900 रुपयांचा अपहार केला.अधिक तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

Share this: