बातम्यामहाराष्ट्रमाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांची तडकाफडकी बदली

पिंपरी (वास्तव संघर्ष): पिपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी शेखर सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे.ओडिशा केडरचे 2005 च्या बॅचचे आयएएस राजेश पाटील यांची आंतरराज्य प्रतिनियुक्तीने पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तपदी 15 फेब्रुवारी 2021 रोजी नियुक्ती झाली. पाटील प्रतिनियुक्तीने 5 वर्षासाठी महाराष्ट्रात आले आहेत. पाटील यांची महापालिकेतील अल्प कारकिर्द विविध कारणांनी वादग्रस्त ठरले होते.

राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव (सेवा) नितीन गद्रे यांनी याबाबतचा आदेश आज (दि. 16) रोजी जारी केला आहे. या आदेशात म्हटले आहे की, शेखर सिंह शासनाने आपली नियुक्ती पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त या पदावर राजेश पाटील (भाप्रसे) यांच्या जागी ते पद वरिष्ठ समय श्रेणीत अवनात करून केली आहे. तरी आपण नवीन पदाचा कार्यभार राजेश पाटील यांच्याकडून त्वरित स्वीकारावा.

Share this: