पिंपरी चिंचवडमध्ये स्मार्टसिटीच्या कामामध्ये ‘स्मार्ट’ पद्धतीने वृक्षतोडीचे प्रमाण अधिक
पिंपरी (वास्तव संघर्ष) : पिंपरी चिंचवडमध्ये अनेक वर्षांपासून बेकायदेशीर वृक्षतोड होत आहे. नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांकडून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला नियमितपणे तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत. परंतु या तक्रारींची दखलच घेतली जात नसल्याचा आरोप रयत विद्यार्थी परिषदेने केला आहे. पिंपरी चिंचवडमधील पिंपळे निलख येथील विनापरवाना वृक्षतोड केल्याने ठेकेदार आणि स्थापत्य विभाग अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी , अशी देखील रयत विद्यार्थी परिषदचे सचिव रविराज काळे यांनी पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
काळे यांनी या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पालिकेचे अधिकारी ज्यु.इंजि . कदम मॅडम ( ड प्रभाग स्थापत्य ) आणि सदर ठेकेदार में , A.G.Associat मार्फत प्रभाग क्रमांक 26 पिंपळे निलख येथील स्व . कै . प्रभाकर साठे उद्यान समोरील रस्त्यावरील कॅशिया प्रजातिचे झाड विनापरवाना तोडण्यात आले आहे . पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये महा ( नागरी श्रेत्र ) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम अंमलात असून सदर कार्यक्षेत्रातील कोणत्याही वृक्षाचा विस्तार कमी करणे / वृक्षतोड करणे / वृक्ष पुर्नरोपण करणे अगोदर उद्यान वृक्ष संवर्धन विभागाची परवानगी घेणे आवश्यक होते .
परंतु ज्यु.इजि . कदम मॅडम ( ड प्रभाग स्थापत्य ) आणि संबंधित ठेकेदार हे A.G.Associat यांनी प्रभाग क्रमांक 26 मधील स्मार्ट सिटी अंतर्गत रस्त्याच्या मधील कॅशिया प्रजातिचे झाड स्थापत्य विभागा मार्फत जे.सी.बी च्या सहाय्याने पुर्णपणे काढले आहे . स्मार्टसिटीच्या कामामध्ये स्मार्ट पद्धतीने वृक्षतोडीचे प्रमाण अधिक असल्याचे निदर्शनास येते . स्मार्ट सिटी चे काम चालू आहे कि स्मार्ट वृक्षतोडीचे काम चालू आहे याबाबत आयुक्तांनी खुलासा करावा.
वारंवार पञ व्यवहार करून देखील ड प्रभाग स्थापत्य विभागास कारणे दाखवा नोटीस देऊनही अद्यापही कार्यवाही न झाल्यामुळे स्थापत्य विभाग संबंधितांना पाठीशी घालण्याचे काम करत आहे. विनापरवाना तोडल्याचे पंचनाम्यात नमूद आहे. तरीही कारवाईस विलंब होत असल्यामुळे आयुक्त साहेब आपणाकडे मागणी करत आहोत की संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई करावी . असे देखील रविराज काळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.