महाराजांच्या तरुण मावळ्यांसोबत काही पावले दौडल्याचे समाधान. – डॉ. अमोल कोल्हे
शिरूर (वास्तव संघर्ष) ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मध्ये मुख्य भूमिका साकारत असलेल्या डॉ. अमोल कोल्हे यांना या मालिकेने चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. मालिका विश्वासह त्यांनी राजकारणात देखील उडी घेतली आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघातून ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांचा मतदारसंघात प्रचाराचा धडाका सुरु आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिथीप्रमाणे जयंती साजरी होत आहे. पुणे-आळंदी मार्गावरून डॉ. कोल्हे प्रचारासाठी जात असताना शिवप्रेमी तरुणांची शिवज्योत घेऊन चाललेली रॅली दिली. क्षणाचाही विलंब न करता डॉ. कोल्हे रॅलीत सहभागी झाले.
महाराजांच्या तरुण मावळ्यांसोबत काही पावले दौडल्याचे समाधान. – डॉ. अमोल कोल्हे
शिवप्रेमी तरुणांनी काढलेल्या शिवज्योत रॅलीत दौडले डॉ. अमोल कोल्हे. महाराजांचे आपल्यावर असणारे ऋण तर कधी फिटणारे नाहीत. या महाराष्ट्राच्या मातीला महाराजांनी शिकवलेला अभिमान आणि स्वबळावर विश्वास यांवर आधुनिक महाराष्ट्र आजही उभा आहे. माझ्या वतीने मी ज्यांचे विचार, कर्तृत्व आणि मुल्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो, त्या छत्रपती शिवाजी महाराज यांना मी त्यांच्या जयंतीनिमित्त शतशः नमन करतो.