बातम्यामहाराष्ट्रमाझं पिंपरी -चिंचवड

अरे बापरे! राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे बांधले प्रेत

पिंपरी (वास्तव संघर्ष) : छत्रपती शिवाजी महाराज  यांचा एकेरी उल्लेख करत समर्थ रामदास नसते तर, शिवाजीला कोणी विचारले असते? असे वादग्रस्त विधान करुन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी  यांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत असून जगभरात त्यांचा मोठा नावलौकिक आहे. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारात वाढलेल्या कोश्यारी यांनी छत्रपतींचा केलेला अपमान महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही. त्यांनी आपले विधान मागे घेत महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी, अशी मागणी करत राष्ट्रवादी रिपब्लिकन पार्टीच्या वतीने राज्यपालाची प्रेत यात्रा काढून निषेध करण्यात आला.

मोशी येथे राष्ट्रवादी रिपब्लिकन पार्टीच्या वतीने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे प्रतिकृती प्रेत बनवून शुक्रवार (दि.11) रोजी त्यांची प्रेतयात्रा काढून निषेध व्यक्त करण्यात आला .मात्र घटनेचे गांभीर्य ओळखून सदर ठिकाणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी तत्काळ आंदोलक कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन सोडून दिले. यावेळी आंदोलनात रामभाऊ ठोके, अमित गायकवाड, युवराज तिकडे, सुरेश गायकवाड,लक्ष्मण पांचाळ,आदि कार्यकर्ते सहभागी झाले होते. सदर आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी रिपब्लिकन पार्टीचे शहराध्यक्ष ज्ञानेश्वर बोराटे यांनी केले.

दरम्यान, समर्थ रामदास हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू नव्हते असे असतानाही काही विशिष्ट इतिहासकारांकडून इतिहासाची मोडतोड करून समर्थ रामदास हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू असल्याचे बिंबवण्याचा प्रयत्न मागील काही वर्षांत जाणीवपूर्वक केला जात आहे. तीच रिघ ओढून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छञपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला आहे. याबाबत महाराष्ट्रातील विविध ठिकाणी निषेध आंदोलन मोर्चे निघत असून त्यातीलच हे आंदोलन करण्यात आले आहे.

Share this: