महाराष्ट्र

लक्ष्मण माने यांना अटक करा – मराठा क्रांती मोर्चा

लक्ष्मण माने यांना अटक करा - मराठा क्रांती मोर्चा
लक्ष्मण माने यांना अटक करा – मराठा क्रांती मोर्चा

वास्तव संघर्ष –  ‘उपरा’ कार लक्ष्मण माने यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात मराठा समाजातील महिलांबाबत वादग्रस्‍त वक्तव्य केले होते. याचा निषेध म्‍हणून सातार्‍याच्या मराठा क्रांती मोर्चावतीने जिल्हाधिकार्‍यांकडे गुन्‍हा दाखल करण्याची मागणी केली. माने समाजात फूट पाडणे आणि महिलांबद्दल मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुण्यातील ओबीसी आरक्षण जागर परिषदेत ‘उपरा’कार लक्ष्मण माने यांनी मराठा समाजातील महिला व मुलींबद्द वादग्रस्‍त वक्तव्य केले आहे. याबद्दल मराठा क्रांती मोर्चाकडून माने यांचा महिलांबद्दल उद्देश चांगला नाही. यापूर्वी त्यांच्यावर बलात्कार व अत्याचाराचे गुन्हे दाखल झाले आहेत यामुळे त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे.

या वादग्रस्‍त वक्‍तव्‍यामुळे त्यांच्यावर ३५४ अ स्त्रीला लज्जा उत्पन्न होईल असे अश्लिल मतितार्थ असलेले शब्दप्रयोग वापरणे, आयपीसी कलम २९२ शिवराळ भाषा वापरणे, कलम १५३ अ एका समुदायाला भांडण्यासाठी उचकावून देशाच्या एकात्मतेचा भंग करून समाजात भांडणे लावणे, कलम ५०४ अश्लिल शिवीगाळ करणे, कलम ५०६ धमकी देणे अशा कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी.  त्यांना अटक न केल्यास मराठा समाज जनआंदोलन उभा करणार असा इशारा देण्यात आला

Share this: