Videoबातम्यामहाराष्ट्र

राज ठाकरे हे सुपारी घेऊन भाषणे करतात-मुख्यमंत्री

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सुपारी घेऊन भाषणे करतात, त्यांच्या भाषणाची स्क्रिप्ट बारामतीमधून लिहून येते अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुंबईमध्ये आयोजित भाजपच्या महिला मेळाव्यात बोलत असतांना त्यांनी ही टीका केली.

आगामी लोकसभा-विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसंवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षणी जोरदार तयारीही सुरु केली आहे. आणि विशेष म्हणजे आज (१० मार्च) संध्याकाळ पासून आचारसंहिता लागू होणार आहे. याचदरम्यान मुंबईत भाजपा तर्फे महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराजही उपस्थित होत्या. यावेळी उपस्थितांना संबोधतांना, लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा सज्ज आहे. त्यामुळे महाराष्ट्रात ४५ लोकसभेच्या जागांवर युतीचा झेंडा फडकावणारच. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले.

विशेष म्हणजे, यावेळी बोलतांना त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. त्यावेळी राज ठाकरे हे सुपारी घेऊन भाषणे करतात, त्यांच्या भाषणाची स्क्रिप्ट बारामतीमधून लिहून येते. अशी टीका त्यांनी केली.

इतकेच नव्हे तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात बलशाली भारताची निर्मिती झाली आहे. आणि विशेष म्हणजे भाजपामुले भारत बदलतोय, महाराष्ट्र बदलतोय असेही त्यांनी म्हंटले. याचबरोबर पुलवामा येथे झाल्या दहशतवादी हल्ल्याला भारताच्या हवाई दलाने एअर स्ट्राईक द्वारे दिलेल्या उत्तराला त्यांनी दुजोरा दिला आहे. भारतावर दहशतवादी हल्ला झाला त्या हल्ल्याला भारताने सडेतोड उत्तर दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सैन्यावर विश्वास दाखवला. म्हणून हे शकय झाले. असेही त्यांनी म्हंटले.

Share this: