पिंपरीतील शुज दुकानामध्ये तलवारीचा धाक दाखवून सशस्त्र दरोडा
पिंपरी (वास्तव संघर्ष) :पिंपरीतील शुज दुकानामध्ये तलवारीचा आणि कोयत्याचा धाक धाक दाखवून टोळक्याने दरोडा टाकला आहे. ही घटना गुरुवारी (दि.24) रोजी रात्री सव्वाआठच्या सुमारास एमबी शुज दुकान गणेश हॉटेलजवळ पिंपरी येथे घडली आहे.
गणेश परशुराम परब ( वय-25) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार किरण प्रकाश डोंगरे , सिध्दार्थ गायकवाड , संतोष पवार (सर्व रा. मिलिंदनगर. पिंपरी पुणे) व त्यांचे आणखीन 7 अनोळखी साथीदार सर्वांचे वय अंदाजे (19ते21) या आरोपींविरुद्ध पिंपरी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमबी शुज दुकान गणेश हॉटेलजवळ प्लॉट नं-302 पिंपरी येथील दुकानात गुरुवारी रात्री आरोपी पैसे न देता जबरदस्तीने बूट व चप्पल घेऊन जात होते. त्या वेळी फिर्यादी यांनी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. त्यामुळे चिडलेला आरोपी संतोष पवार याने आम्ही पिंपरीतील भाई आहोत , तुला माहिती नाही का, बूट खरेदीचे पैसे मागतो काय ” असे म्हणून फिर्यादी यांच्या दंडावर तलवारीने वार केला. त्यानंतर आरोपींनी आपसात संगनमत दोन मोठ्या निळ्या रंगाच्या प्लास्टीकच्या कॅरीबॅगमध्ये 18 बूट व चप्पल असा 12 हजार 960 रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने चोरून नेला. तसेच जाताना दुकान आणि वाहनांवर दगडफेक करीत नुकसान केले . आरोपींचा भर चौकात वर्दळीच्या ठिकाणी सुरू असलेला हा धुडगूस पाहून परिसरातील व्यापाऱ्यांनी भीतीपोटी आपल्या दुकानांचे शटर खाली ओढले .अधिक तपास पिंपरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सचिन सुर्यवंशी करित आहेत.