मुस्लीम मतं काँग्रेसपासून फोडण्यासाठी प्रकाश आंबेडकर भाजपला साथ देतात – अबु आझमी
वास्तव संघर्ष आॅनलाईन मुंबई : लोकसभा निवडणुकीत काँग्रेस ने वंचीत बहुजन आघाडीला भाजपची बी टिम असा आरोप केला होता आता समाजवादी पक्षाचे (सपा) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर आरोप करत टीका केली आहे आझमी यांनी प्रकाश आंबेडकर हे भाजपला मदत करत असल्याचा आरोप केला.
मुस्लीम मतं काँग्रेसपासून फोडण्यासाठी भाजपचा कट सुरु आहे, ज्यात प्रकाश आंबेडकरही साथ देत आहेत, एमआयएमने वंचितपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला त्यावर आझमी बोलत होते.दरम्यान, समाजवादी पार्टी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीसोबत असेल. मतांचे विभाजन होऊ नये हा आमचा प्रयत्न आहे, असं आझमी म्हणाले.
सपाकडून सात जागांची मागणी करण्यात आली आहे. शिवाजीनगर, भिवंडी पूर्व, औरंगाबाद पूर्व, भायखळा ही जागा आम्हाला हवी आहे. भायखळ्यात मैत्रीपूर्ण लढत होईल. तीन जागांवर अजून चर्चा सुरु आहे, पण त्या मिळायला पाहिजे असा आमचा हट्ट नाही, असंही आझमी म्हणाले.