बातम्या

निगडीतील फूटपाथ बाहेरील रस्त्यावरील पिवळ्या पट्टीच्या बाहेर आलेली दुकाने काढा :राजू हिरवे

पिंपरी (वास्तव संघर्ष) :पिंपरी चिंचवडमध्ये निगडीतील फूटपाथ बाहेरील रस्त्यावरील पिवळ्या पट्टीच्या बाहेर आलेली दुकाने काढण्यात यावी यासाठी झुंज दिव्यांग संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजू हिरवे यांनी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांना निवेदन दिले आहे.

हिरवे यांनी या निवेदनात म्हटले आहे की, सेक्टर नंबर 22 डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत सरकारी दवाखानाच्या समोर अनधिकृतपणे वाढीव काम केले आहे. फुटपाथवरील रस्त्यावर अनेक दुकानदार व्यवसाय करत आहे.फुटपाथवर त्यांच्या टपरी आहे.परंतु अनेक दुकान मालक रस्त्यावर पिवळ्या रंगाची पट्टी पर्यंत दुकान लावतात. त्या फुटपाथ समोर सरकारी मोठा दवाखाना आहे त्या परिसरात मोठी वाहतूक होते.

तेथे दवाखाना असल्याने वाहतूक कोंडी होऊन अपघात होण्याची दाट शक्यता आहे.तरी फुटपाथ सोडुन ज्या व्यापा-यांनी भर रस्त्यावर दुकाने टाकलीत ती तात्काळ काढण्यात यावी.भविष्यात एखादी मोठी घटना घडली तर त्याला जबाबदार कोणं असा प्रश्न निर्माण होवु शकतो.म्हणुन उपाय योजना म्हणून आपणं रस्ता सदर तात्काळ अतिक्रमण मुक्त होवुन मिळवा.अन्यथा आपण व्यापारी यांच्या कार्यवाही न केल्यास व तिथं त्याठिकाणी अपघात झाल्यास आपण आपले प्रशासन जबाबदार राहील असेही या निवेदनात म्हटले आहे.

Share this: