क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

दागिने चोरण्याच्या उद्देशाने महिलेचा खून ;एक वर्षानंतर लागला हत्येचा छडा

चिखली (वास्तव संघर्ष) : एक वर्षापूर्वी झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील चार आरोपींना पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट -1 ने अटक केली आहे. महिलेकडील सोन्याचे दागिने चोरण्याच्या उद्देशाने हा खून करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले. हरगुडे वस्ती येथे कमल खाणेकर उर्फ नुरजहा कुरेशी यांचा त्यांच्या राहत्या घरी हातपाय बांधून , तोंडाला चिकटटेप लावून , तिचा गळा दाबून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. ही घटना 5 ऑगस्ट 2021 रोजी घडली होती.

या प्रकरणी मोहंमद शेख ( वय 25 वर्षे , रा . साय नगर देहूरोड ) , वासिब खान ( रा . झेंडेमळा , देहूगाव ) , अब्दुल अन्सारी ( रा . रुपीनगर तळवडे ) , रईसउद्दीन राईन ( रा . मोरेवस्ती चिखली ) या चार आरोपींना आता ताब्यात घेण्यात आले आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट -1 ने उत्तर प्रदेश व बिहार राज्यातून आलेले व चिखली व एमआयडीसी भोसरी परिसरात राहणारे रेकॉर्डवरील गुन्हेगारांना चेक करण्याचे ठरवून एक वर्षांपूर्वी गुन्हेगारांनी नियोजनबद्ध खून केलेला असा कोणताही पुरावा पोलिसांनी सोडला नव्हता. पोलिस जंगजंग पछाडत होते. मात्र हाती काहीही लागत नव्हते. आर्म ऍक्टच्या गुन्ह्यामध्ये अटक आरोपी मोहंमद शेख याला चौकशी कामी गुन्हे युनिट -1 शाखा कार्यालयात आणले . त्याचे वर्तन संशयास्पद असल्याचे त्यांना आढळून आले . त्याच्याकडे सखोल तपास करता माहिती मिळाली , की तो व त्याचे साथीदार वसीब खान , अब्दुल अन्सारी , रईसउद्दीन राईन असे चौघांनी मिळून हरगुडे वस्ती येथे एकटी राहणाऱ्या महिला कमल खाणेकर उर्फ नुरजहा कुरेशी हिचा खून केला होता. तसेच, सदरची महिला ही एकटीच राहत असून तिच्या अंगावर भरपूर प्रमाणात दागिने असत.

तसेच ती जमिनीची खरेदी विक्री करत असल्याने तिच्या घरात मोठ्या प्रमाणात पैसे असण्याची शक्यता असल्याने तिचा गेम केल्यास पूर्ण आयुष्य सेट होईल असा विचार केला . त्यांनी नियोजन करून 5 ऑगस्ट 2021 ला मध्यरात्री त्या महिलेच्या घरात प्रवेश करून तिचा निर्घृण खून करून तिच्या घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली . अधिक तपास चिखली पोलीस करीत आहेत.

Share this: