नाहीतर मी तुझ्यावर बलात्कार करेन.. असे म्हणून महीलेला मारहाण
पिंपरी (वास्तव संघर्ष) :एका महिलेच्या घरात घुसून मारहाण करत मी तुझ्यावर बलात्कार करेन अशी धमकी देण्यात आली आहे.ही घटना बुधवारी (दि.23) रोजी दुपारी अडीच वाजता
चेतन गायकवाड शाळेच्या समोर सिध्दार्थनगर बावधन मुळशी येथे घडली आहे.
याबाबत पिडीत महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
विनायक दगडु कांबळे (वय-60), महिला आरोपी, सुमेध विनायक कांबळे (वय-31, सर्व चेतन गायकवाड शाळेच्या समोर सिध्दार्थनगर बावधन बु ता. मुळशी जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेच्या आईचे राहते घरी वरील सर्व तीनही आरोपी घरात घुसून , फिर्यादीच्या आईचा गाऊन फाडुन काठिने मारहाण करत जखमी केले तसेच फिर्यादीला अश्लिल शिवीगाळ करुन मारहाण केली व आरोपी सुमेध याने फिर्यादी समोर त्याची पॅन्टची चैन उघडुन फिर्यादीच्या अंगावर धावुन जावुन फिर्यादी हिचा टि शर्ट फाडुन तुझ्यावर बलात्कार करतो असे धमकावुन फिर्यादी हिचा विनयभंग केला. अधिक तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.