क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

फक्त एक लाखाच्या खंडणीसाठी त्या आठ वर्षांच्या चिमुकल्याचा खून

चिखली (वास्तव संघर्ष) : फक्त एक लाख रुपयांच्या खंडणीसाठी एका नराधमाने आठ वर्षीय मुलाचा दगडाने ठेचून खून केला आहे.या निर्घृण खूनाचा छडा चिखली पोलीसांनी लावून आरोपीला अटक केली आहे. ही घटना चिखली परिसरात रविवारी ( दि .17 ) रात्री 8.30 सुमारास घडली होती.

लक्ष्मण देवासी ( वय – 8 वर्ष , रा. हरगुडेवस्ती,चिखली ) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे.

बपीलअहमद रईस लष्कर (वय-26 , रा. गणेशमंदीरजवळ , हरगुडेवस्ती कुदळवाडी चिखली , मुळगाव : आसाम) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , लक्ष्मण देवासी हा रविवारी दुपारी 12.30 वाजता कुणालाही काहीही न सांगता घरातून बाहेर निघून गेला. त्यानंतर घरातल्यांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला . दरम्यान , त्याच्या घरच्यांनी मुलाचे अपहरण केल्याची शंका व्यक्त करत चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.चिखली पोलिसांना या मुलाचा मृतदेह चिखली येथील एका पडक्या घरात आढळून आला आहे. दगडाने ठेचून त्याचा खून करण्यात आला आहे. सिसिटिव्हीच्या साह्याने आरोपी बपीलअहमद याचा पोलीसांनी शोध घेतला. आरोपी बपीलअहमद याने पोलिसांना गुन्हा केल्याची कबुली देवुन 1 लाख रुपये खंडणी मागण्याकरीता लक्ष्मण याचे अपहरण केले व त्यास निर्जन पत्र्याचे शेडमध्ये घेवुन गेला व त्याने आरडा ओरड करून नये म्हणुन त्यास दगडाने डोक्यात मारुन त्याचा खून केला आहे. अशा प्रकारे गुन्हा उघडकीस आणलेला असुन आरोपीस चिखली पोलीस ठाणेस पुढील कारवाई करीता रिपोर्टने ताब्यात देण्यात आले

Share this: