बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

भाजपकडून शरद पवार यांच्या निवासस्थानी 10 लाख वेळा ‘जय श्रीराम’ लिहिलेली पत्र पाठविण्याचा संकल्प

पिंपरी (वास्तव संघर्ष) अयोध्येत भव्य राम मंदिर भूमिपूजनाची तारीख जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ”मंदिर बांधल्याने कोरोना आटोक्यात येणार आहे का ?”, असा प्रश्न उपस्थित केला. याच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने शरद पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थानी 10 लाख वेळा ‘जय श्रीराम’ लिहिलेली पत्र पाठविण्याचा संकल्प करण्यात आला आहे.जय श्री राम लिहिलेली 10 लाख पत्रे राज्यातून भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पाठविणार आहे.येत्या दोन दिवसात ही पत्रे पोहचतील आणि सोशल मिडियावरही त्याबाबत राळ उठविण्याचे नियोजन भाजयुमोने केले आहे.

अयोध्येतील राममंदिराचे भूमिपूजन 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.त्या बद्दल टिप्पणी करताना पवार यांनी राम मंदिर बांधल्याने कोरोना जाणार आहे का? असे म्हटले होते त्याचा निषेध म्हणून राज्यातील भाजपचे 10 लाख कार्यकर्ते पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी पत्रे पाठविणार आहे,अशी माहिती भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी दिली.यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यातील भाजयुमोची यंत्रणा कार्यरत झाली आहे.मुंबई, ठाणे या परिसरातून काल या उपक्रमाची सुरवात झाली आहे.

त्याच मोहिमेला धरून आज पिंपरी चिंचवड शहर भाजपा युवा मोर्चा यांच्यावतीने आज मोहीम राबविण्यात आली,या वेळी उपस्थित महापौर-:मा.सौ.उषा (माई) ढोरे (पिं. चिं महानगरपालिका)
मा. श्री.जवाहर शेठ ढोरे (सदस्य -भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश)
मा. श्री.संकेत चोंधे- शहराध्यक्ष-भाजपा युवा मोर्चा,पिं.चिं शहर
साई कोंढरे-शहरउपाध्यक्ष-:भाजपा युवा मोर्चा पिं. चिं. शहर
दिनेश यादव (स्वीकृत सदस्य), अभिजित बागुल,शुभम कांबळे,राजेश राज पुरोहित,सुमित घाटे,प्रकाश चौधरी,उदय गायकवाड, शिवराज लांडगे,अतुल राक्षे,भूषण गायके हे पदाधिकारी उपस्थित होते

Share this: