बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

भाजपचे गटनेते तथा सभागृह नेते एकनाथ पवार यांचा राजीनामा

पिंपरी (वास्तव संघर्ष) – पिंपरी – चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे गटनेते तथा सभागृह नेते एकनाथ पवार यांनी आज राजीनामा दिला आहे . याबाबतची माहिती पवार यांनीच आज ( सोमवारी ) पत्रकार परिषदेत दिली .

फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपची एकहाती सत्ता आली . भाजपची सत्ता येताच निष्ठावान असलेल्या एकनाथ पवार यांची सभागृह नेतेपदी नियुक्ती झाली होती . त्यांना तीन वर्षाचा कार्यकाळ मिळाला .आपण स्वखुशीने हा राजीनामा दिला आहे यानंतर आपण पक्षवाढीसाठी काम करणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

एकनाथ पवार यांनी भाजपचे शहराध्यक्षपद देखील भूषविले आहे . त्यांनी अचानक दिलेल्या राजीनामा वरुन राजकीय वातावरणात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.

Share this: