क्राईम बातम्याबातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

स्थायी समिति अध्यक्ष विलास मडेगिरी यांची हकालपट्टी करा ;वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा ईशारा

पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ . पवन साळवे हे मागासवर्गीय समाजाचे असल्याने त्यांना वित्तीय अधिकार मिळू नये म्हणून गेली चार महिने त्यांचा विषय तहकूब ठेवणारे भाजपचे नगरसेवक व स्थायी समितीचे विदयमान अध्यक्ष विलास मडेगिरी यांची यावरून जातीयवादी मानसिकता समोर आली असून जातीयवादी मडेगिरी यांची स्थायीच्या अध्यक्षपदावरून कार्यकाळ संपण्यापूर्वीच हकालपट्टी करा,व त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात यावे .अशा मागणीचे निवेदन वंचीत बहुजन आघाडी चे पिंपरी चिंचवड युवकाध्यक्ष गुलाब पानपाटील यांनी भाजपचे पक्षनेते एकनाथ पवार यांना दिले आहे.यावेळी राजुभाई शेख, रमेश गायकवाड, शरद वाघमारे, अमोल जावळे, अविराज कालेकर, बाबासाहेब अंकुटे, जिवन पवार, इम्तियाज खान आदी उपस्थित होते.

या निवेदनात पानपाटील यांनी म्हटले आहे की, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ . पवन साळवे यांना वित्तीय ( आर्थिक ) अधिकार देण्यासंदर्भात २८ फेब्रुवारी २०१९ रोजीच आदेश काढले आणि यासंदर्भात १३ – ९ – २०१९ ला नगरसचिव विभागाकडे देखील पत्र देण्यात आले आहे आहे . तसेच दिनांक २५ – ९ २०१९ ला डॉ . पवन साळवे यांचा विषय प्रथम मंजूरीसाठी स्थायी समितीच्या अजेंड्यावर आला होता माञ ब्राह्मण समाजाचे असलेल्या जातीयवादी विलास मडेगिरी यांनी मागासवर्गीय समाजातील डॉ पवन साळवे यांना जाणूनबुजून वित्तीय अधिकार मिळू नये म्हणून हा विषय चार महिने तहकूब ठेवला १८ / ११ / २०१९ ला डॉ पवन साळवे यांचा विषय पुन्हा मंजरीसाठी आला मात्र जातीयवादी ब्राह्मण विलास मडेगिरी यांनी पुन्हा विषय तहकूब केला . २७ / १२ / २०१९ ला अजेंड्यावर आलेला विषय तहकूब करण्यात आला आहे . गेली चार महिने हा विषय तहकूब करण्यात आला . पुन्हा ४ / २ / २०२० रोजी हा विषय तहकूब करण्यात आला .

विलास मडीगेरी हे डॉ . साळवे यांचा विषय तहकूब ठेवण्याचे एकमेव कारण म्हणजे ते मागासवर्गीय आहेत . आणि मडेगिरीहे ब्राह्मण असल्याने त्यांना मुद्दाम अधिकार देत नाहीत . मडेगिरी यांनी याआधी आचारसंहिता काळात 330 कोटीचे विषय मंजूर केले रात्री तीन वाजेपर्यंत वर्क आडर दिल्या मग डॉ . पवन साळवे नियमात बसत असताना देखील अशा जातीयवादी मानसिकता ठेवून मडेगिरी का वागत आहेत ? भाजपचा जातीयवादी चेहरा यामुळे समोर आला असून त्यामुळे त्यांचे नगरसेवक पद रद्द करून कार्यकाल पुर्ण होण्याआधी त्यांची हकालपट्टी करण्यात यावी . जर त्यांची नगरसेवक पद रद्द न केल्यास विलास मडीगेरी यांच्या तोंडाला काळं फासण्यात येईल . व बुधवार दि . १२ / ०२ / २०२० रोजी आंदोलन घेण्यात येईल . याची आपण पक्षाचे गटनेते या नात्याने दखल घेऊन विलास मडीगेरीवर कारवाई करावी .

Share this: