आरोग्यमाझं पिंपरी -चिंचवड

चिंता वाढली! पिंपरी चिंचवडमध्ये एकाच कुटुंबातील चारजण कोरोना पॉझिटीव्ह

पिंपरी (वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे . मागील पाच दिवसांमध्ये दररोज नवीन रुग्ण आढळून येत आहेत . मागील चार दिवसात 10 नवे रुग्ण आढळून आले आहेत . यामध्ये पुण्यातील एका प्रसिद्ध रुग्णालयात काम करणाऱ्या आणि पिंपरी चिंचवडमध्ये राहणाऱ्या एका नर्सचा समावेश आहे . तिची कोरोनाचा रिपोर्ट शनिवारी पॉझिटिव्ह आला आहे . यानंतर तिच्या पतिमध्ये कोरोनाचे लक्षण आढळून आल्याने त्याला क्वारंटाईन करण्यात आले आहे . त्याचा आज रिपोर्ट आला असून तो पॉझिटिव्ह आला आहे .

त्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये एकाच कुटुंबातील चौघांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे .त्यामुळे आता प्रशासनाची देखील चिंता वाढली आहे. शनिवारी एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळली होती , त्याच्याच कुटुंबातील या चार महिला आहेत . शहरात आज एकूण पाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले . तर एकाचा मृत्यू ही झाला . शहरात एकूण 35 कोरोनाचे रुग्ण झालेत .यापैकी 12 रूग्ण कोरोनामुक्त झालेत . उर्वरित 23 रुग्णांपैकी 19 रुग्णांवर पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात तर तिघांवर पुण्यात उपचार सुरु आहेत.

Share this: