बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभुमीवर मालकांनी दोन महिन्यांचे भाडे माफ करावे – चांगदेव गिते

पिंपरी (वास्तव संघर्ष )- पिंपरी चिंचवड परिसरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे त्यातच आता पिंपरी चिंचवड शहरात कामगार व स्थलांतरीत भाडेकरू जर भाडयाच्या खोलीत राहत असतील तर एक महिना त्यांना घरमालकांनी भाडे मागू नये असे शासनाकडून कळविण्यात आले होते . मात्र आता महाराष्ट्रात लॉकडाउन 30 एप्रिलपर्यंत वाढला असून भांडेकरूनी भाडे कसे भरायचे असा प्रश्न उपस्थित होत आहे. म्हणून घर/दुकान मालकांनी भाडेकरूंना दोन महिन्यांचे भाडे माफ करावे अशी मागणी सुशिक्षित बेजगारांचे नेते चांगदेव गिते यांनी केली आहे.

गिते म्हणाले, करोना संसर्गाच्या धर्तीवर भाडेकरू यांना एक महिन्याचे भाडे न घेण्याबाबत केंद्र शासनाकडून निर्देश प्राप्त झाले आहेत. मात्र महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने आणि लॉकडाऊन वाढला आहे त्यामुळे घरमालकांनी याबाबत आपतकालीन स्थितीचा विचार करून लोकांना सहकार्य करावे.

कोरोनाच्या आपत्तीत सर्वांचेच जनजीवन विस्कळीत झाले असल्याने अनेक छोट्या मोठ्या उद्योगांवर, व्यवसायावर व नौकऱ्यावर ही त्याचा मोठा परिणाम झाला आहे. या अडचणीत सर्व भारतीयांनी एकमेकांना आधार देणं गरजेचं असल्याचे मत चांगदेव गिते यांनी व्यक्त केले. या संदर्भात आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवणार असून अशा अनेक प्रश्नां संदर्भात कोरोना आपत्ती गेल्यावर त्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Share this: