क्राईम बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

पिंपरीतील मिलिंदनगर येथे तरूणावर कोयत्याने वार;पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पिंपरी (वास्तव संघर्ष) ‘ मी तुला एक महिन्यापासून समजावत आहे . माझ्या विरोधात दाखल केलेला गुन्हा मागे घे . मला सरकारी नोकरी करायची आहे . मी सांगितलेलं तुझ्या लक्षात येत नाही का . आम्ही तुला गायब करू अशी धमकी देत एका तरूणावर कोयत्याने वार करून जखमी केले. हा प्रकार मंगळवारी पिंपरीतील मिलिंदनगर याठिकाणी घडला आहे.

याप्रकरणी राहुल बापुराव टोणपे ( वय 26 , रा . मिलिंदनगर पिंपरी ) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .

त्यानुसार कुणाल बेद ( वय 30 ) , कपिल किसन बेद ( वय 28 ) , करण टाक ( वय 20 , सर्व रा . पिंपरी ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , मंगळवारी फिर्यादी आणि त्यांचे मित्र पिंपरीतील मिलिंदनगर येथे गप्पा मारत थांबले होते . त्यावेळी आरोपी कुणाला त्यांच्याजवळ आला . त्याने राहुल यांना हाक मारून बोलावून घेतले .

‘ मी तुला एक महिन्यापासून समजावत आहे . माझ्या विरोधात दाखल केलेला गुन्हा मागे घे . मला सरकारी नोकरी करायची आहे . मी सांगितलेलं तुझ्या लक्षात येत नाही का . आम्ही तुला गायब करू . ‘ अशी धमकी आरोपी कुणाल याने फिर्यादी राहुल यांना दिली . त्यानंतर कुणाल याने राहुल यांच्या डोक्यात कोयता मारला . मात्र राहुल यांनी तो चुकविल्याने त्यांच्या हातावर जखम झाली . राहुल यांना मारल्याने त्यांचा मित्र शुभम रोकडे याने आरोपी कुणाल याला पकडून ठेवले . आरोपी करण याने फिर्यादी यांना चाकूने मारण्याचा प्रयत्न केला असता रोहित मोरे मध्ये पडले . त्यामुळे रोहित यांच्या हातावर चाकूचा वार झाला . यानंतर आरोपी कपिल याने शेजारी पडलेली बियरची रिकामी बाटली रोहित यांच्या डोक्यात फोडली . तसेच तिन्ही आरोपींनी फिर्यादी राहुल आणि त्यांच्या दोन मित्रांना बेदम मारहाण करत जखमी केले . यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले . पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत .

Share this: